GT vs CSK IPL2023 : एमएस धोनी क्रिकेटच्या मैदानात उतरतो, तेव्हा टीमच्या प्रदर्शनाबरोबर धोनीच्या कॅप्टनशिपवर नजर असते. अनेकदा धोनी आपले निर्णय आणि रणनितीने प्रतिस्पर्धी टीमला अडचणीच आणतो. अनेकदा धोनीचे निर्णय चुकतात सुद्धा. पण असं फार कमीवेळा झालय, जेव्हा एकाच सामन्यात त्याच्या बऱ्याच चूका झाल्या आहेत. आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात धोनीकडून अशा चुका झाल्या. गुजरात टायटन्स विरुद्ध धोनीचा एक नाही, तीन निर्णय चुकले.
शिवम दुबेला पाठवून चूक
CSK ने पहिली बॅटिंग केली. हाच धोनीचा निर्णय चुकला. चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या स्फोटक बॅटिंगच्या बळावर 13 ओव्हर्समध्ये 121 धावा केल्या होत्या. चेन्नईकडे 200 धावांपर्यंत पोहोचण्याची संधी होती. ते रवींद्र जाडेजाला पाठवू शकत होते, पण धोनीने त्याजागी शिवम दुबेला पाठवलं.
मागच्या सीजनमध्ये शिवम दुबे सीएसकेसाठी काही चांगल्या इनिंग खेळला होता. पण सध्याचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेता, जाडेजा योग्य पर्याय होता. शिवम दुबेने 18 चेंडूत 19 धावा केल्या. त्याच्यामुळे चेन्नईच्या वेगाला ब्रेक लागला. त्यांच्या टीमने फक्त 178 धावा केल्या. विजयासाठी 20 धावा कमी पडल्या.
इम्पॅक्ट प्लेयर निवडताना चूक
चेन्नईने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वेगवान गोलंदाज तृषार देशपांडेची निवड केली. पहिली फलंदाजी केल्यामुळे वेगवान गोलंदाजाला संधी देणं स्वाभाविक होतं. पण देशपांडेची निवड चुकली. तृषार देशपांडे मागच्या सीजनमध्ये जितके सामने खेळला, त्या मॅचमध्ये त्याने 10 रन्स प्रति ओव्हरच्या इकॉनमीने बॉलिंग केली होती. त्याने फक्त 4 विकेट काढल्या होत्या.
CSK कडे सिमरजीत सिंहच्या रुपात एक चांगला पर्याय होता. त्याने मागच्या सीजनमध्ये 6 सामन्यात 7.67 च्या इकॉनमीने रन्स दिले होते. 4 विकेट काढले होते. तृषार यावेळी सुद्धा महागडा गोलंदाज ठरला. त्याने 3.2 ओव्हर्समध्ये 51 धावा देऊन एक विकेट काढला.
गोलंदाजाचा वापर करताना काय चूका केल्या?
धोनीने या मॅचमध्ये फक्त 5 गोलंदाजांचा वापर केला. यात दीपक चाहर आणि रवींद्र जाडेजाची गोलंदाजी चांगली वाटली. IPL मध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या 20 वर्षाच्या राजवर्धन हंगरगेकरने प्रभावित केलं. त्याने 3 विकेट काढले. तृषार देशपांडे आणि मिचेल सँटनर प्रभाव पाडू शकले नाहीत. अशावेळी धोनीने स्पिनर मोइन अलीचा वापर का केला नाही? हा प्रश्न निर्माण होतो.
तृषार देशपांडे आणि हंगरगेकर यांच्या गोलंदाजीचा वेग जवळपास समान आहे. शिवम दुबेच्या मंदगतीमुळे गुजरातच्या फलंदाजांनी चूका केल्या असत्या, पण धोनीने दुबेला संधी दिली नाही.