IPL Trophy CSK Tirupati Temple : सीएसकेने फायनल जिंकल्यावर ट्रॉफीची तिरूपती बालाजी मंदिरात खास पूजा, पाहा व्हिडीओ

IPL 2023 Trophy Tirupati Temple : ट्रॉफीची पारंपारिक तमिळ विधींनी पूजा करण्यात आली. मंदिरात ट्रॉफी आणतानाचा आणि पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

IPL Trophy CSK Tirupati Temple : सीएसकेने फायनल जिंकल्यावर ट्रॉफीची तिरूपती बालाजी मंदिरात खास पूजा, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 12:31 AM

मुंबई : आयपीएल 2023 मधील फायनल सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा 5 विकेट्सने  पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं होतं. सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने ट्रॉफी जिंकल्यानंतर ती तिरुपती बालाजी मंदिरात देवाच्या चरणी ठेवली. ट्रॉफीची पारंपारिक तमिळ विधींनी पूजा करण्यात आली. मंदिरात ट्रॉफी आणतानाचा आणि पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या पूजेदरम्यान सीएसके संघाचा कोणताही खेळाडू दिसला नाही.

पाहा व्हिडीओ-

तिरुपती बालाजी मंदिरात पूजेदरम्यान आयपीएल ट्रॉफीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विशेष पूजा करण्यात आली. तसे, आयपीएल जिंकल्यानंतर ट्रॉफी मंदिरात आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्रॉफी जिंकल्यानंतर मंदिरात पूजेसाठी आणण्यात आली होती. फ्रँचायझीचे मालक एन. संघाच्या यशाबद्दल श्रीनिवासन यांनी मंदिरात पोहोचून तिरुपती बालाजी देवाचा आशिर्वाद घेतला.

सीएसकेने आतापर्यंत पाचवेळा विजेतेपदार नाव कोरलं आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखालीच मिळवली आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडिअन्सने सर्वाधिक पाचवेळा ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता सीएसकेनेही हा कामगिरी करत शिरपेचात आणथी एक मानाचा तुरा रोवला आहे.

आयपीएलच्या इतिहासात जितक्या फायनल झाल्या त्यामधील सर्वात जास्त थरारक फायनल ही यंदाच्या पर्वात झाली. कारण हा अंतिम सामना तीन दिवस चालला. वारा,पाऊस आणि त्यानंतर मैदानात झालेला चिखल अनेक संकटे आलीत मात्र शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यामध्ये सीएसकेने विजय मिळवला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताने चेन्नईला 215 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र पावसामुळे हा सामना 15 ओव्हर्सचा करण्यात आला आणि 171 धावांचं आव्हान सीएसकेला देण्यात आलं. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत 10 धावा करत संघाला विजय मिळवू दिला.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....