Prithvi Shaw, IPL 2021 | चेन्नई विरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी, उलगडलं गमावलेल्या परफॉरमन्सचं रहस्य, विजयानंतर मोठा खुलासा

दिल्ली कॅपिट्ल्सचा (delhi capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (prithvi shaw) चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 72 धावांची धमाकेदार खेळी केली.

Prithvi Shaw, IPL 2021 | चेन्नई विरुद्ध पृथ्वीची धमाकेदार खेळी, उलगडलं गमावलेल्या परफॉरमन्सचं रहस्य, विजयानंतर मोठा खुलासा
दिल्ली कॅपिट्ल्सचा (delhi capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (prithvi shaw) चेन्नई विरुद्धच्या सामन्यात 72 धावांची धमाकेदार खेळी केली.
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 5:05 PM

मुंबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 14 व्या मोसमाची (IPL 2021) विजयी सुरुवात केली. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. दिल्लीची सलामी जोडी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी 189 धावांच्या विजयी आव्हानाचे पाठलाग करताना 138 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. तसेच दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळाकावली. पृथ्वीने या सामन्यात सर्वांचेच लक्ष वेधूने घेतलं. पृथ्वीने एकूण 72 धावांची खेळी केली. पृथ्वीने सामन्यानंतर गमावलेला फॉर्म परत कसा मिळवला, याबाबतचा खुलासा केला. (csk vs dc ipl 2021 delhi capitals opener prithvi shaw on pravin amre)

पृथ्वी काय म्हणाला?

“विजयानंतर फार चांगलं वाटतं आहे. या विजयात सर्वांनी योगदान दिलं. आमची चांगली सुरुवात झाली. दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टी अनुकूल होती. आम्ही चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मला डच्चू देण्यात आला. मी त्यानंतर प्रवीण आमरे (Pravin Amre) सरांकडे गेलो. त्यांच्या सोबत मी फलंदाजीबाबत चर्चा केली. त्यानंतर मी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळलो. त्याचा मला फायदा झाला. मी पुन्हा एकदा कमबॅक केल्याने आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीने दिली.

गेल्या आयपीएलच्या मोसमासत पृथ्वीला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. तो अनेकदा शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र पृथ्वीने आपल्या खेळात मोठी सुधारणा केली. प्रचंड मेहनत घेत कामगिरी सुधारली.

“योजनेनुसार खेळ केला”

“विजय हजारे स्पर्धेआधी मी नियोजन केलं होतं. त्यानुसार मी सराव केला. याचा मला फायदा झाला. मला टीम इंडियातून वगळण्यात आलं. हा क्षण माझ्यासाठी फार निराशाजनक होता. पण मला पुढे जायचं होतं. त्यामुळे मी याबाबत फार विचार केला नाही. माझ्या फलंदाजीत काही उणीवा असतील तर मी त्यात सुधारणा करावी लागले. तसेच मी त्यावर मेहनत घेत आहे”, असंही पृथ्वीने नमूद केलं.

अवघ्या काही आठवड्यांपूर्वी विजय हजारे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीने आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं होतं. पृथ्वीने फलंदाजी आणि कर्णधाराची दुहेरी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. पृथ्वी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने एकूण 8 सामन्यात 165.40 च्या सरासरीने 827 धावांचा रतीब घातला. यामध्ये त्याने 3 शतक आणि 1 द्विशतक झळकावलं.

संबंधित बातम्या :

CSK vs DC, IPL 2021 | आधी शून्यावर बाद, त्यानंतर दिल्लीकडून मोठा पराभव, ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीला ‘जोर का झटका’

IPL 2021 : शिखर धवनने रचला आयपीएलमध्ये इतिहास, असा कारनामा करणारा एकटाच ‘गब्बर’!

(csk vs dc ipl 2021 delhi capitals opener prithvi shaw on pravin amre)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.