CSK vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊवर 12 धावांनी मात, चेन्नईचा पहिला विजय

| Updated on: Apr 04, 2023 | 1:27 AM

CSK vs LSG IPL 2023 Highlights in Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यतील हा सामना एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. उभयसंघांचा हा या मोसमातील दुसरा सामना होता.

CSK vs LSG IPL 2023 Highlights | लखनऊवर 12 धावांनी मात, चेन्नईचा पहिला विजय

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 6 वा सामना हा लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला . चेन्नई सुपर किंग्सने  या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.  या सामन्याचं आयोजन हे एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.  चेन्नईने पहिले बॅटिंग करत लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं.  मात्र लखनऊला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या.  लखनऊचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 03 Apr 2023 11:38 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | चेन्नईचा होमग्राउंडमध्ये लखनऊवर विजय

    चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र लखनऊला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा या मोसमातील पहिला विजय ठरला.

  • 03 Apr 2023 10:56 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊची चांगल्या सुरुवातीनंतर घसरगुंडी

    लखनऊने 218 धावांचं पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईने जोरदार कमबॅक करत लखनऊला बॅकफुटवर ढकललं आहे. लखनऊने आतापर्यंत 14 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 136 धावा केल्या आहेत. लखनऊला विजयासाठी 36 बॉलमध्ये 82  धावांची गरज आहे.

  • 03 Apr 2023 10:07 PM (IST)

    लखनऊची आक्रमक सुरुवात, विजयासाठी 218 धावांचं आव्हान

    लखनऊने 218 धावांचं पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली आहे. कॅप्टन केएल राहुल आणि कायले मेयर्स या सलामी जोडीने 4 ओव्हर्समध्ये बिनबाद 56 धावा केल्या आहेत.

  • 03 Apr 2023 09:48 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊला चेन्नईकडून 218 रन्सचं टार्गेट

    चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे याने 47 रन्संचं योगदान दिलं. ऋतुराज आणि डेव्हॉन या दोघांनी केलेल्या 110 धावांच्या सलामी भागीदारीमुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. तर लखनऊकडून रवी बिश्नोई आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.

    ‘चेन्नई एक्सप्रेस सुस्साट’

    चेन्नईकडून ऋतुराज या डेव्हॉन या व्यतिरिक्त शिवम दुबे आणि अंबाती रायुडू या दोघांनी प्रत्येकी 27 धावांचं योगदान दिलं. मोईन अली 19 रन्सवर आऊट झाला. धोनीने 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारुन 12 धावा केल्या. धोनीने यासह विक्रम केला. तर बेन स्टोक्स याने 8, रविंद्र जडेजा याने 3 आणि मिचेल सँटनरने 1* धाव केली.

  • 03 Apr 2023 09:28 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | चेन्नईचं लखनऊसमोर 218 धावांचं आव्हान

    चेन्नईने 20 षटकात 7 गडी गमवून 217 धावा केल्या. लखनऊसमोर विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊला प्रत्येक षटकात 10.9 च्या सरासरीने धावा कराव्या लागणार आहेत.

  • 03 Apr 2023 08:59 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | मोईन अली आऊट, चेन्नईला चौथा झटका

    चेन्नई सुपर किंग्सने शानदार सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले आहेत. डेव्हॉन कानवे आणि ऋतुराज गायकवाड  सलामी जोडीने 110 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर चेन्नईने झटपट ठराविक अंतराने  4 विकेट्स गमावल्या. चेन्नईचे ऋतुराज गायकवाड,  डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे आणि मोईन अली हे 4 फलंदाज आऊट झाले आहेत.

  • 03 Apr 2023 08:02 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | ऋतुराजच गायकवाडची वादळी खेळी

    चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 60 धावा केल्या आहेत.

    चेन्नई – 60-0, 5 ओव्हर्स

    ऋतुराज गायकावड -40*

    डेव्हॉन कॉनवे – 14*

  • 03 Apr 2023 07:37 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | ऋतुराज-डेव्हॉन मैदानात, चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामी जोडी मैदानात आली आहे. लखनऊने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 03 Apr 2023 07:34 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन

    केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

  • 03 Apr 2023 07:33 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन

    महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

  • 03 Apr 2023 07:26 PM (IST)

    CSK vs LSG IPL 2023 Live Score | लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकला

    चेन्नई विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकला आहे. लखनऊचा कॅप्टन केएल राहुल याने नाणेफेक जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

Published On - Apr 03,2023 7:24 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.