Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड याचा खणखणीत सिक्स, बॉल थेट कारवर आदळला
ऋतुराज गायकवाड याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यात त्याने एकूण 4 सिक्स मारले. यापैकी मारलेला एक सिक्स हा थेट कारवर जाऊन आदळला.
तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 6 वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवणयात येत आहे. या सामन्यात चेन्नईने टॉस गमावून बॅटिंग करताना शानदार सुरुवात केली. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने चेन्नईला शानदार सुरुवात करुन दिली. या ओपनिंग जोडीने फक्त 9.1 ओव्हरमध्ये 110 रन्सची पार्टनरशीप केली. ऋतुराजने या दरम्यान या मोसमातील सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. ऋतुराजने अवघ्या 25 बॉलमध्ये ही अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजने या अर्धशतकी खेळीत 4 सिक्स मारले. ऋतुराजने यात मारलेला एक सिक्स हा थेट मैदानात असलेल्या कारवर जाऊन आदळला. ऋतुराजने मारलेल्या या सिक्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मैदानाबाहेर असलेली ही कार आयपीएल जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूला मिळणार आहे. प्रत्येक सामन्यात ही कार ठेवण्यात येते. ऋतुराजने मारलेला फटका हा थेट कारच्या दरवाजाच्या आसपासच्या भागात लागला. यात कारचं फार नुकसान झालं नाही. मात्र कारचा पत्र्याचं थोड्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
ऋतुराजकडून लखनऊ विरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ऋतुराज 7 धावा जोडल्यानंतर 57 रन्स करुन ऋतुराज आऊट झाला. ऋतुराजने 31 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 चोकारांच्या मदतीने एकूण 57 रन्स केल्या.
ऋतुराजचा जोरदार सिक्स कारवर आदळला
Ruturaj Gaikwad six broken tata car door, 5 Lakh rupees donation, csk vs lsg ipl 2023#RuturajGaikwad #IPL2023 #CSKvsLSG pic.twitter.com/RzjQHJBhph
— Bharat Thapa (@BharatT63903695) April 3, 2023
दरम्यान चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे याने 47 रन्संचं योगदान दिलं. ऋतुराज आणि डेव्हॉन या दोघांनी केलेल्या 110 धावांच्या सलामी भागीदारीमुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. तर लखनऊकडून रवी बिश्नोई आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.
चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.