Ruturaj Gaikwad | ऋतुराज याचा एकच पण कडक सिक्स, आता मिळणार 5 लाख रुपये

ऋतुराज गायकवाड याने मारलेल्या जोरदार सिक्समुळे टाटा कारचं नुकसान झालं. मात्र त्यानंतरही टाटा समूहाकडून 5 लाख रुपये मिळणार आहेत. कसं ते जाणून घ्या सविस्तर.

Ruturaj Gaikwad | ऋतुराज याचा एकच पण कडक सिक्स, आता मिळणार 5 लाख रुपये
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 2:57 AM

तामिळनाडू | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 6 वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर 12 धावंनी विजय मिळवला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 218 धावांसमोर लखनऊला 20 ओव्हरमध्ये 205 धावाच करता आल्या. मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी चेन्नईच्या विजयाची शिल्पकार ठरली. मोईन अली याने लखनऊच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर त्याआधी ऋतुराज गायकवाड याने या मोसमातील सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. ऋतुराजने अवघ्या 25 बॉलमध्ये ही अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजने या अर्धशतकी खेळीत 4 सिक्स मारले. ऋतुराजने यात मारलेला एक सिक्स हा थेट मैदानात असलेल्या कारवर जाऊन आदळला. ऋतुराजने मारलेल्या या सिक्ससाठी आता 5 लाख रुपये मिळणार आहेत.

मैदानाबाहेर असलेली ही कार आयपीएल जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूला मिळणार आहे. प्रत्येक सामन्यात ही कार ठेवण्यात येते. ऋतुराजने मारलेला फटका हा थेट टाटा टियागो ईवी कारच्या दरवाजाच्या आसपासच्या भागात लागला. यात कारचं फार नुकसान झालं नाही. मात्र कारचा पत्र्याचं थोड्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र त्यानंतरही 5 लाख रुपये मिळणार आहेत. आता हे सर्व गुंता आपण इस्कटून जाणून घेऊयात.

टाटा आयपीएल 2023 चे अधिकृत प्रायोजक आहेत. यामुळे मैदानात टाटा टियागो ईवी कार मैदानात ठेवली जाते. फलंदाजाने फटका मारला आणि तो थेट मैदानात असलेल्या या कारला लागल्यास 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानुसार ऋतुराजने मारलेला फटका हा गाडीला जाऊन लागला.

ऋतुराजचा कडक हीट टाटा कारवर धडकला

त्यामुळे टाटा समूहाकडून 5 लाख रुपयांची रक्कम ही कर्नाटकमधील कॉफी प्लाँट्सला देण्यात येणार आहेत. गायकवाडने मारलेला हा फटक्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान या सामन्यात ऋतुराजने लखनऊ विरुद्ध 31 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 चोकारांच्या मदतीने एकूण 57 रन्स केल्या. तर याआधी ऋतुराजने गुजरात विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 92 धावांची वादळी खेळी केली होती. ऋतुराजच्या नावावर यो मोसमात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 149 रन्स केल्या आहेत. त्यामुळे ऋतुराज हा ऑरेन्ज कॅप विनर आहे.

चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.