Rohit Sharma | डोकेबाज धोनी! रोहित शर्मा याला जाळ्यात अडकवत असा काढला काटा
महेंद्रसिंह धोनी याने दीपक चाहरच्या मदतीने रोहित शर्मा याचा टप्प्यात कार्यक्रम केला. धोनीने रोहितची फिल्डिंग लावत मनासारखा शॉट मारायला भाग पाडलं मग जे झालं....
तामिळनाडू | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 16 व्या मोसमातील 49 वा सामना हा एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. रोहित जाणीवपूर्वक ठरवल्यानुसार रणनितीचा भाग म्हणून तिसऱ्या स्थानी खेळायला आला. मात्र रोहितची ही हुशारी धोनीच्या अनुभवासमोर फोल ठरली. रोहित या सामन्यातही झिरोवर आऊट झाला.
धोनीकडून रोहितची शिकार
चेन्नई सुपर किंग्स कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने रोहित शर्मा याला आपल्या जाळ्यात फसवलं. दीपक चाहर याने स्लोअर बॉलिंगने सुरुवात केली. त्यानंतर धोनी स्टंपच्या जवळ विकेटकीपिंग करण्यासाठी आला. त्यामुळे दीपकने पुन्हा स्लोअर बॉल टाकला. रोहितने बॉलवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रोहितने मारलेला फटका हा थेट रविंद्र जडेजा याच्या हातात गेला.
धोनीची हुशारी रोहित माघारी
?MSD comes up to the stumps ?
?Rohit Sharma attempts the lap shot
?@imjadeja takes the catch ?
Watch how @ChennaiIPL plotted the dismissal of the #MI skipper ?? #TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/fDq1ywGsy7
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
रोहित शर्माचा नकोसा विक्रम
रोहित शर्मा याची आयपीएलमध्ये एकूण 16 वी तर या हंगामात एकूण 4 वेळा झिरोवर आऊट होण्याची वेळ ठरली. रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा फलंदाज ठरला. रोहितनंतर सुनील नरेन, मनदीप सिंह आणि दिनेश कार्तिक हे तिघे प्रत्येकी 15 वेळा झिरोवर आऊट झाले आहेत.
चेन्नईला 140 धावांचं आव्हान
दरम्यान चेन्नईच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मुंबईला चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 139 धावाच करता आल्या. मुंबईचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. इशान किशन 7, कॅमरुन ग्रीन 6 आणि रोहित शर्मा भोपळा न फोडताच माघारी परतला. त्यानंतर नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव आणि ट्रिस्टन स्ट्रब्स या तिकडीने मुंबईची लाज राखली. या तिघांनी अनुक्रमे 64, 26 आणि 20 धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिड आणि अर्शद खान या दोघांनी 2 आणि 1 असा स्कोअर केला. तर जोफ्रा आर्चर याने 3 आणि पीयूष चावला 2 नाबाद धावा केल्या.
चेन्नईकडून महेश पथीराना याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर आणि तुषार देशपांडे या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश थीक्षाना.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल आणि अर्शद खान.