CSK vs RCB IPL 2023 Highlights | चेन्नईचा आरसीबीवर 8 धावांनी विजय, फाफ-ग्लेनची वादळी अर्धशतकी झुंज
CSK vs RCB IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएल 2023 स्पर्धेत 24 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 8 धावांनी मात केली आहे. चेन्नईचा हा या मोसमातील तिसरा विजय ठरला आहे.
बंगळुरु | चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा त्यांच्यांच होम ग्राउंडमध्ये म्हणजेच एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममध्ये 8 धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 226 धावा केल्या. बंगळुरुसमोर विजयासाठी 227 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 218 धावाच करता आल्या. चेन्नईचा हा आरसीबीवर आयपीएल इतिहासातील 20 वा विजय ठरला. आयपीएल इतिहात या दोन्ही संघांची ही आमनेसामने येण्याची 31 वी वेळ होती.
LIVE Cricket Score & Updates
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | विराटवर धोनी वरचढ, रंगतदार सामन्यात चेन्नईचा आरसीबीवर सुपर विजय
चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर त्यांच्याच घरात 8 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने आरसीबीला विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आरीबाला चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 218 धावांवरच रोखलं. आरसीबीला 8 विकेट्स गमावून 218 धावच करता आल्या.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | वेन पार्नेल आऊट
आरसीबीने सातवी विकेट गमावली आहे. वेन पार्नेल 2 धावा करुन आऊट झाला आहे.
-
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | शाहबाज अहमद आऊट, आरसीबीला सहावा धक्का
दिनेश कार्तिकनंतर आरसीबीने शाहबाज अहमद याच्या रुपात सहावी विकेट गमावली आहे. चेन्नईने यासह सामन्यात कमबॅक केलं आहे.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | दिनेश कार्तिक आऊट
आरसीबीने पाचवी विकेट गमावली आहे. दिनेश कार्तिक 28 धावा करुन बाद झाला आहे. आरसीबीचा स्कोअर 16.5 ओव्हरमध्ये 5 बाद 191 असा झाला आहे. आरसीबीला विजयासाठी 19 बॉलमध्ये आणखी 36 धावांची गरज आहे.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | मॅक्सवेलनंतर कॅप्टन फाफ डु प्लेसीस आऊट, सामना रंगतदार स्थितीत
आरसीबीने चौथी विकेट गमावली आहे. ग्लेन मॅक्सवेल याच्यानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसीस आऊट झाला आहे फाफने 33 बॉलमघ्ये 62 धावांची खेळी केली. आता मैदानात हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिक ही जोडी खेळत आहे.
-
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | ग्लेन मॅक्सवेल याच्या वादळी खेळीचा द एन्ड, आरसीबीची तिसरी विकेट
महेश तीक्षणा याने आरसीबीची ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस ही सेट जोडी फोडली आहे. आरसीबीने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर या दोघांनी वादळी खेळी करत शतकी भागीदारी केली. यामुळे चेन्नई बॅकफुटवर गेली. मात्र अखेर महेशने मॅक्सवेल याला 76 धावांवर कॅप्टन विकेटकीपर महेंद्रसिंह धोनी याच्या हाती कॅचआऊट केलं.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | मॅक्सवेल-फाफ दोघांचं अर्धशतक, आरसीबी मजबूत स्थितीत
फॅफ पाठोपाठ ग्लेन मॅक्सवेल यानेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. आरसीबीने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर फाफ आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने डाव सावरत फटकेबाजी केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. त्यांनतर शतकी भागीदारीही पूर्ण केलं.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | आरसीबीकडून पावरप्लेचा पुरेपुर फायदा
आरसीबीने पावर प्लेचा पुरेपुर फायदा घेतला आहे. आरसीबीने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने हल्लाबोल केला. आरसीबीने 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 75 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल 20 आणि फाफ 45 धावांवर खेळत आहेत.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | आरसीबीची दुसरी विकेट
विराट कोहली याच्यानंतर आरसीबीने दुसरी विकेट गमावली आहे. महिपाल लोमरुर याला भोपळाही फोडता आला नाही. आरसीबीची 227 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली आहे.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | विराट कोहली आऊट
आरसीबीला मोठा झटका लागला आहे. विराट कोहली स्वसतात आऊट झाला आहे. विराट 6 धावा करुन माघारी परतला.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात
आरसीबीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीसमोर विजयासाठी 227 धावांचं आव्हान आहे.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | बंगळुरुला विजयासाठी 227 धावांचं आव्हान, लक्ष्य गाठण्याचं मोठं आव्हान
आयपीएल 2023 स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हायव्होल्टेज सामना सुरु आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 गडी गमवून 226 धावा केल्या. बंगळुरुसमोर विजयासाठी 227 धावांचं आव्हान दिलं आहे.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | चेन्नई सुपर किंग्सचा डाव
ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे जोडी मैदानात उतरली. पण ऋतुराज गायकवाड काही खास करू शकला नाही. 3 धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि कॉनवे जोडीनं डाव सावरला. चौकार षटकारांची आतषबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात वानिंदू हसरंगाला यश आलं.
अजिंक्य रहाणेचा त्याने त्रिफळा उडवला. 20 चेंडूत 37 धावा करून अजिंक्य रहाणे बाद झाला. यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. दुसरीकडे कॉनवेनं आपली आक्रमक खेळी सुरुच ठेवली. त्याने या स्पर्धेतील आपलं दुसरं अर्धशतक झळकावलं. तसेच शिवम दुबेची त्याला चांगली साथ मिळाली. दोघांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली.
कॉनवेला बाद करण्यात हर्षल पटेलला यश मिळालं. कॉनवे 83 धावांवर असताना त्याला क्लिन बोल्ड केलं. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले. शिवम दुबेनं बंगळुरुविरुद्ध वादळी खेळी सुरुच ठेवली. 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हे वादळ रोखण्यात पार्नेलला यश मिळालं.
कमी षटकांचा अंदाज घेऊन मोईन अली आणि अंबाती रायडुने आक्रमक खेळी सुरुच ठेवली. अंबाती रायडु 6 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने 1 चौकार आणि एक षटकार ठोकला.
रवींद्र जडेजाच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 10 धावा केल्या.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | रवींद्र जडेजाच्या रुपाने सहावा धक्का, महेंद्रसिंह धोनी मैदानात
Match 24. WICKET! 19.4: Ravindra Jadeja 10(8) ct Suyash S Prabhudessai (Sub) b Glenn Maxwell, Chennai Super Kings 224/6 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | अंबाती रायडुच्या रुपाने पाचवा धक्का, रवींद्र जडेजा मैदानात
Match 24. WICKET! 17.4: Ambati Rayudu 14(6) ct Dinesh Karthik b Vyshak Vijaykumar, Chennai Super Kings 198/5 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | शिवम दुबेचं वादळ शमलं, 52 धावा करून तंबूत
शिवम दुबेनं बंगळुरुविरुद्ध वादळी खेळी केली. 27 चेंडूत 52 धावांची खेळी केली. हे वादळ रोखण्यात पार्नेलला यश मिळालं.
Match 24. WICKET! 16.3: Shivam Dube 52(27) ct Mohammed Siraj b Wayne Parnell, Chennai Super Kings 178/4 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | कॉनवेचं वादळ शमलं, 83 धावांवर बाद
कॉनवे आणि शिवम दुबे जोडी फोडण्यात हर्षल पटेलला यश आलं. कॉनवे 83 धावांवर असताना त्याला क्लिन बोल्ड केलं. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार ठोकले.
Match 24. WICKET! 15.4: Devon Conway 83(45) b Harshal Patel, Chennai Super Kings 170/3 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | कॉनवेसोबत शिवम दुबेची बॅट तळपली
शिवम दुबे आणि कॉनवे या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. शिवम दुबे आणि कॉनवेनं आक्रमक खेळी सुरुच ठेवली आहे. त्यामुळे बंगळुरुचे गोलंदाज हतबल झाले आहेत.
Power Hitting 101 ft. Shivam Dube ?#RCBvCSK #WhistlePodu #Yellove ?
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | कॉनवेचं अर्धशतक
कॉनवेनं 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे या स्पर्धेतील दुसरंअर्धशतक आहे. यापूर्वी त्याने राजस्थान विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.
ContRA Force! ?#RCBvCSK #WhistlePodu #Yellove ? pic.twitter.com/mu7fwq7X8X
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | अजिंक्य रहाणे 37 धावांवर बाद
आक्रमक खेळी करणारा अजिंक्य रहाणेला बाद करण्यात हसरंगाला यश आलं. त्याने 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली.
Match 24. WICKET! 9.3: Ajinkya Rahane 37(20) b Wanindu Hasaranga, Chennai Super Kings 90/2 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | अजिंक्य रहाणेचा धुमधडाका, चौकार षटकारांचा पाऊस
ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉनव्हे या जोडीनं चांगली फटकेबाजी केली. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली.
5⃣0⃣-run partnership & going strong! ?
Devon Conway & @ajinkyarahane88 are on the move as @ChennaiIPL move to 69/1 after 8 overs. ? ?
Follow the match ▶️ https://t.co/QZwZlNk1Tt#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/5ffqpMUhfM
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | ऋतुराज गायकवाड अवघ्या तीन धावा करून बाद
Match 24. WICKET! 2.2: Ruturaj Gaikwad 3(6) ct Wayne Parnell b Mohammed Siraj, Chennai Super Kings 16/1 https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.
Match 24. Chennai Super Kings XI: R Gaikwad, D Conway, A Rahane, M Ali, A Rayudu, S Dube, R Jadeja, MS Dhoni (c&wk), M Pathirana, M Theekshana, T Deshpande. https://t.co/yi0Yqa9vtV #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज.
Match 24. Royal Challengers Bangalore XI: V Kohli, Faf du Plessis (c), M Lomror, G Maxwell, S Ahmed, D Karthik (wk), W Hasaranga, H Patel, W Parnell, M Siraj, V Vijaykumar. https://t.co/yi0Yqa9vtV #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | नाणेफेकीचा कौल बंगळुरूच्या बाजून, गोलंदाजी करण्याचा निर्णय
Match 24. Royal Challengers Bangalore won the toss and elected to field. https://t.co/yi0Yqaa3jt #TATAIPL #RCBvCSK #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2023
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | एमएस धोनी करणार हिशोब चुकता?
चिन्नास्वामी मैदानावर दोन्ही संघ शेवटचे 2019 मध्ये भिडले होते. या सामन्यात बंगळुरुने एक धावेने विजय मिळवला होता. या सामन्यात धोनीने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. पण संघाला विजय मिळवून देता आला नाही.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | बंगळुरुचा संपूर्ण संघ
बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.
-
CSK vs RCB IPL 2023 Live Update | चेन्नईचा संपूर्ण संघ
चेन्नईचा पूर्ण स्कॉड : एमएस धोनी, डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, सुभ्रांशु सेनापति, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, के भगत वर्मा, मोइन अली, राज्यवर्धन हंगरगेकर, शिवम दुबे, दीपक चाहर, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंह, अजिंक्य रहाणे, तुषार देशपांडे, बेन स्टोक्स, मथीश पथिराना, शेख रशीद, निशांत सिंधु आणि अजय मंडल.
Published On - Apr 17,2023 5:19 PM