CSK vs SRH, IPL 2022 : हैदराबादसमोर 155 धावांचं लक्ष्य, जडेजाच्या फलंदाजीचं चहुकडे कौतुक

| Updated on: Apr 09, 2022 | 5:57 PM

आयपीएल 2022च्या (IPL 2022) सीजन 15 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबादमध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय.

CSK vs SRH, IPL 2022 :  हैदराबादसमोर 155 धावांचं लक्ष्य, जडेजाच्या फलंदाजीचं चहुकडे कौतुक
चेन्नई संघ
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) सीजन 15 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (CSK vs SRH) या दोन संघामध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला 155 धावांचं लक्ष्य दिलंय. या सीजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या चेन्नईने (CSK) हैदराबादच्या विरुद्ध सुरुवात तर चांगली केली. मात्र, त्यांना आणखी चांगले रन बनवता आले असते. पण, तसं चेन्नईच्या संघाला जमलं नाही. रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड हे चांगले खेळत होते. पण त्यांना चांगले रन नाही काढता आले. त्यानंतर रायडू आणि मोईन अली यांनी संघासाठी चांगली खेळू करुन रन बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना फारस यश आल्याचं दिसलं नाही. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा हरल्याचं दिसून आलं. त्यापूर्वी शिवम दुबे याने तीन रन बनवले आणि तोही आऊट झाला. तर शेवटच्या ओवरमध्ये रवींद्र जडेजाच्या तुफान फलंदाजीने चेन्नईला दीडशेच्या जवळपास रन बनवता आले.

हैदराबादसमोर 155 धावांचं लक्ष्य

शेवटच्या 5 षटकात चेन्नई सुपर किंग्सने 3 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा केल्या. एमएस धोनी 3 धावा करून बाद झाला. धोनीला बाद करून मार्को येन्सनने आयपीएलची पहिली विकेट घेतली. एडन मार्करामने मोईन अलीला बाद केले. त्याची आयपीएलमधली ही पहिली विकेट होती. तर नटराजन याची कामगिरी प्रभावी दिसून आली. टी नटराजननेही चमकदार कामगिरी करत 4 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले. त्याने CSKचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला क्लीन बोल्ड केले. त्याचवेळी शिवम दुबेला उमरान मलिककरवी झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात नटराजनने यॉर्कर बॉल्सने अनेकदा त्रास दिला.हैदराबादसमोर 155 धावांचे लक्ष्य तर आता जडेजाच्या फलंदाजीचं चहुकडे कौतुक होतंय.सुरुवाला खराब खेळ झाला. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या डावाला अखेरच्या षटकात कर्णधार जडेजाने 15 चेंडूत 23 धावा देत साथ दिली. याआधी मोईन अलीने 35 चेंडूत 48 धावा केल्या होत्या.

शेवटी शेवटी खेळ सावरला

मोईनची विकेट मार्करामच्या खात्यात

मोईन अली 35 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. त्याची विकेट एडन मार्करामच्या खात्यात आली. बाद होण्यापूर्वी मोईनने लाँग ऑनवर शानदार षटकार ठोकला. मोईनची ही या मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती.रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या 3 षटकात संघाची धावसंख्या 25 धावा होती. मात्र, यानंतर एसआरएचने जोरदार पुनरागमन करत दोन्ही सलामीवीरांना बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

इतर बातम्या

गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं? जाणून घ्या दोन्ही बाजूचा युक्तीवाद

Gunratan Sadavarte : प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या 109 जणांना न्यायलयीन कोठडी, सदावर्तेंना मात्र पोलीस कोठडी मिळाली कारण…

Pune Neelam Gorhe : ‘कोर्टाचा आदेशही धुडकावणाऱ्या आंदोलकांचा हेतू पवार कुटुंबीयांना इजा करण्याचा असावा’