CSK vs SRH, IPL 2021 Match 23 Result | ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक, चेन्नईचा विजयी पंच, हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय
CSK vs SRH Live Score, IPL 2021 | सनरायजर्स हैदराबादसमोर चेन्नई सुपर किंग्सचे तगडे आव्हान

दिल्ली : चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium Delhi) करण्यात आले होते. (csk vs srh score ipl 2021 match chennai super kings vs sunrisers hyderabad scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)
Key Events
चेन्नईने हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. यासह चेन्नईने या मोसमातील सलग 5 वा विजय साकरला. चेन्नईची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. मात्र त्यानंतरच्या सर्व सामन्यात चेन्नईने विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या विजयासह चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये बंगळुरुला पछाडत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
विजयी धावांचे पाठलाग करताना चेन्नईची धमाकेदार सुरुवात झाली. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. यो दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. ऋतुराजने 75 तसेच फॅफने 56 धावांची खेळी केली.
LIVE Cricket Score & Updates
-
चेन्नईचा विजयी पंच
चेन्नईने हैदराबादवर 7 विकेट्सने मात केली. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान चेन्नईने 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 75 धावांची खेळी केली. तसेच फॅफ डु प्लेसिसने 56 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतले. चेन्नईचा हैदराबाद विरुद्धचा हा सलग 5 वा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरुला पछाडत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
All Over: In the first game of #IPL2021 at Arun Jaitley Stadium, Delhi, @ChennaiIPL emerge victorious by 7 wickets as they outplay #SRH in all three departments of the game. https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/JVa1vxhUg8
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
चेन्नईला सलग 2 धक्के
राशिद खानने चेन्नईला सलग 2 धक्के दिले आहेत. राशिदने मोईन अली पाठोपाठ फॅफ डु प्लेसीसला आऊट केलं आहे.
-
-
चेन्नईला दुसरा झटका
चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. राशिद खानने मोईन अलीला केदार जाधवच्या हाती कॅच आऊट केलं आहे. मोईनने 15 धावा केली.
-
चेन्नईला पहिला झटका
दमदार सुरुवातीनंतर चेन्नईने पहिली विकेट गमावली आहे. फटकेबाजी करत असलेला ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. गायकवाडला राशिद खानने बोल्ड केलं. गायकवाडने 44 चेंडूत 12 चौकारांसह 75 धावांची शानदार खेळी केली .Finally, a wicket for #SRH and it is @rashidkhan_19, who breaks the deadlock.
After an excellent 50, Ruturaj is castled by the ace leggie. #CSK lose their first wicket for 129 and now need 43 runs in 42 balls.https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/L0xa1rDCHC
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
ऋतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक
फॅफ डु प्लेसिसच्या मागोमाग ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 5वं अर्धशतक ठरलं. -
-
फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडीची शतकी भागीदारी
फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडीची शतकी भागीदारी पूर्ण झाली आहे. यासह फॅफने अर्धशतकही पूर्ण केलं. फॅफच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 19 वं अर्धशतक ठरलं.
-
चेन्नईचा 9 ओव्हरनंतर स्कोअर
चेन्नईने 9 व्या ओव्हरमध्ये 17 धावा चोपल्या आहेत. यासह चेन्नईचा स्कोअर 9 ओव्हरनंतर बिनबाद 84 धावा केल्या आहेत. यामुळे चेन्नईला विजयासाठी आणखी 11 ओव्हरमध्ये 88 धावांची आवश्यकता आहे.
-
चेन्नईची धडाक्यात सुरुवात, पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 50 धावांपर्यंत मजल
चेन्नईच्या सलामीवीरांनी धडाक्यात सुरुवात केली आहे. फॅफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड या जोडीने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 50 धावांची नाबाद भागीदारी रचत विजयाच्या दिशेने कूच केली आहे.
-
चेन्नईचा 5 ओव्हरनंतर स्कोअर
चेन्नईच्या फॅफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. या दोघांनी पहिल्या 5 ओव्हरमध्ये 43 धावा जोडल्या आहेत.
-
चेन्नईची शानदार सुरुवात
चेन्नईची शानदार सुरुवात झाली आहे. फॅफ डु प्लेसीस आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 धावा केल्या आहेत.
-
चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात
चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. चेन्नईला विजयासाठी 172 धावांची आवश्यकता आहे.
-
चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान
हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. हैदराबादकडून मनिश पांडेने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 57 धावा केल्या. तसेच केन विलियमनसनने 26 धावांची छोटेखानी खेळी केली.
After keeping it tight for a large part of the game, #CSK concede 44 runs in the last 18 balls as #SRH get 171-3 from their 20 overs.
Stay tuned for the chase. https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/I9xYLdYZQw
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
19 व्या ओव्हरमधून 20 धावा
केन विलियमसनने 19 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 3 चौकार आणि 1 सिक्ससह 20 धावा फटकावल्या आहेत.
-
फॅफ डु प्लेसीसचा शानदार कॅच, मनिष पांडे आऊट
हैदराबादने तिसरी विकेट गमावली आहे. फॅफ डु प्लेसीसने हवेत झेप घेत मनिष पांडेचा सुंदर कॅच घेतला आहे. मनिष पांडेने 46 चेंडूत 61 धावांची खेळी केली.
-
हैदराबादला मोठा धक्का
हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. झुंजार अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर आऊट कॅच आऊट झाला आहे. वॉर्नरने 55 चेंडूत 3 फोर आणि 2 सिक्ससह 57 धावांची खेळी केली.
Match 23. 17.1: WICKET! D Warner (57) is out, c Ravindra Jadeja b Lungi Ngidi, 128/2 https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडेने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या शतकी भागीदारीदरम्यान दोघांनी आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं.
? now ??
Double ?? for these two ? https://t.co/mf0JTFP32Y
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 28, 2021
-
डेव्हिड वॉर्नरचा खणखणीत सिक्स, अर्धशतक पूर्ण
डेव्हिड वॉर्नरने16 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर 77 मीटरचा खणखणीत सिक्स लगावला. या सिक्ससह वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केलं. वॉर्नरसाठी हे अर्धशतक खासं ठरलं. वॉर्नरच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
FIFTY@davidwarner31 50th #VIVOIPL 50✅200 Sixes ✅10,000 T20 runs ✅https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/poBQz37AXY
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
15 व्या ओव्हरमधून 11 धावा
हैदराबादने 15 व्या ओव्हरमध्ये 11 धावा केल्या आहेत.यामध्ये डेव्हिड वॉर्नरने सिक्स लगावला. या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर वॉर्नरने दुहेरी धाव घेतली. यासह वॉर्नरच्या टी 20 क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण झाल्या.
-
मनिष पांडेचे अर्धशतक
हैदराबादचा आक्रमक फलंदाज मनिष पांडेने शानदार अर्धशत झळकावलं आहे. जाडेजाने 35 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं.
A high-quality fifty from @im_manishpandey on his 150th IPL match ??#CSKvSRH #OrangeOrNothing #OrangeArmy #IPL2021 pic.twitter.com/BR4QtMraC4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 28, 2021
-
मनिष पांडेचा चौकार, हैदराबादच्या 100 धावा पूर्ण
मनिष पांडेने 14 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर चौकार लगावला. यासह हैदराबादच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
Match 23. 13.5: R Jadeja to M Pandey, 4 runs, 100/1 https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
वॉर्नरचा चौकार, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. डेव्हिड वॉर्नरने 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. यासह या जोडीची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली.
Fifty partnership ??#SRH – 77/1 (11)#CSKvSRH #OrangeOrNothing #OrangeArmy #IPL2021 pic.twitter.com/KkQ8ThVM4M
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 28, 2021
-
मनिष पांडेचा जोरदार सिक्स
मनिष पांडेने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर जोरदार सुपर सिक्स लगावला आहे.
-
हैदराबादचा 9 ओव्हरनंतर स्कोअर
हैदराबादने 9 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 59 धावा केल्या आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर सावधपणे खेळत आहे. तसेच संधी मिळेल तसं वॉर्नर फटके लगावत आहे. वॉर्नरसोबत मनिष पांडे खेळत आहे.
-
हैदराबादचा पावर प्लेमधील स्कोअर
हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि मनिष पांडे मैदानात खेळत आहेत.
The Powerplay is completed and #SRH manage 39-1. #CSK have kept it tight so far. https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/bEQkvfLcUo
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
हैदराबादला पहिला धक्का
हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. जॉनी बेयरस्टो आऊट झाला आहे. बेयरस्टोने 7 धावा केल्या.
-
सामन्यातील पहिला चौकार वॉर्नरच्या बॅटने
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
धोनीकडून जॉनी बेयरस्टोला जीवनदान
विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीने सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर जीवनदान दिलं आहे. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर लेग स्टंपवर असलेल्या चेंडूवर बेयरस्टोने फिल्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटला स्पर्श करुन धोनीच्या दिशेने गेला. पण धोनीने सहज सोपा कॅच सोडला.
-
सनरायजर्स हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात
सनरायजर्स हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही सलाम जोडी मैदानात खेळत आहेत.
-
दोन्ही संघात बदल
या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल करण्यात आले आहेत. चेन्नईमध्ये ड्वेन ब्राव्हो आणि इम्रान ताहीरच्या जागी लुंगी एनगिडी आणि मोईन अलीला संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादमध्ये संदीप शर्मा आणि मनिष पांडेचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
-
सनरायजर्स हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, जगदीशन सुचित, केदार जाधव, विजय शंकर, मनीष पांडे, केन विलियमसन, खलील अहमद, संदीप शर्मा, राशिद खान आणि सिद्धार्थ कौल.
Match 23. Sunrisers Hyderabad XI: D Warner, J Bairstow, K Williamson, M Pandey, V Shankar, K Jadhav, R Khan, J Suchith, S Sharma, S Kaul, K Ahmed https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग इलेव्हन
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसी, लुंगी एन्गिडी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.
Match 23. Chennai Super Kings XI: F du Plessis, R Gaikwad, M Ali, S Raina, A Rayudu, R Jadeja, MS Dhoni, S Curran, S Thakur, D Chahar, L Ngidi https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला
सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Match 23. Sunrisers Hyderabad win the toss and elect to bat https://t.co/w7vUSl6314 #CSKvSRH #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
-
चेन्नई विरुद्ध हैदराबाद आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 23 वा सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.
Published On - Apr 28,2021 11:06 PM





