Icc Champions Trophy 2025 : टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणारा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून ‘आऊट’, टीमला धक्का
Icc Champions Trophy 2025 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2024 अंतिम स्पर्धेत चिवट बॉलिंग करत 2 विकेट्स घेणारा गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. जाणून घ्या तो कोण आहे?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला आता मोजून काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तानचा अपवाद वगळता इतर 6 देशांनी स्पर्धेसाठी आपली टीम जाहीर केली आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. पाकिस्तान आणि यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. सर्वंच संघ या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये खेळलेला घातक गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे क्रिकेट संघाला मोठा झटका लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया हा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र असं असलं तरी दक्षिण आफ्रिकेसाठी मोठ्या स्पर्धेच्या तोंडावर एनरिक नॉर्खिया बाहेर पडणं हा मोठा धक्का समजला जात आहे. एनरिक नॉर्खिया हा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सहभागी झाला होता. एनरिक नॉर्खियाने अंतिम सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या होत्या.
नॉर्खियाच्या जागी कोण?
दरम्यान नॉर्खियाच्या जागी संघात कुणाचा समावेश केला जाणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. नॉर्खियाच्या जागी गेराल्ड कोएत्झी याला संधी दिली जाऊ शकते. आता निवड समिती काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांचं वेळापत्रक
विरुद्ध अफगाणिस्तान, शुक्रवार 21 फेब्रुवारी, कराची
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मंगळवार 25 फेब्रुवारी, रावळपिंडी
विरुद्ध इंग्लंड, शनिवार 1 मार्च, कराची
एनरिक नॉर्खिया ‘आऊट’
ANRICH NORTJE RULED OUT OF THE CHAMPIONS TROPHY 2025.
– A Big setback for South Africa. pic.twitter.com/krab8bnkxB
— Johns. (@CricCrazyJohns) January 15, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, मार्को यान्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हीड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, रियान रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि रॅसी वॅन डर डुसेन.