Icc World Cup 2023 | 10 टीम आणि 1 ट्रॉफी, गुरुवारपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात

Icc Odi World Cup 2023 | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 10 टीम्स आहेत.त्या 10 संघाचे कर्णधार कोण पहिला आणि अंतिम सामने केव्हा होणार, सर्वकाही माहिती एका क्लिकवर आत्ताच जाणून घ्या.

Icc World Cup 2023 | 10 टीम आणि 1 ट्रॉफी, गुरुवारपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 11:46 PM

अहमदाबाद | 2019 नंतर 4 वर्षांनी 5 ऑक्टोबर 2023 रोजीपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत आहे. या वनडे स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी आहेत. वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 दिवसांमध्ये 48 सामने खेळवण्यात येणार आहेत.देशातील एकूण 10 शहरांमधील प्रसिद्ध स्टेडियममध्ये हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. वर्ल्ड कपनिमित्ताने सर्व स्टेडियमचं नवं रुप पाहायला मिळणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे तयारी केली आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत.

एकूण 10 संघ

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत. या 10 संघांमध्ये यजमान टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि नेदरलँड्सचा समावेश आहे. या 10 पैकी 8 संघांनी वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय केलं. तर श्रीलंका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघानी आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून तिकीट मिळवलं. नेदरलँड्स 12 वर्षानंतर वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली. नेदरलँड्सने अखेरचा वर्ल्ड कप हा भारतात 2011 साली खेळला होता.

10 टीम 10 कॅप्टन

टीम इंडियाचं कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळणार आहे. रोहितची वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून ही पहिलीच वेळ आहे. बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करेल. अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन बांगलादेशचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हशमतुल्लाह शाहिदी अफगाणिस्ताची कॅप्टन्सी करेल. दासुन शनाका श्रीलंकेला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाची सूत्र पॅट कमिन्स याच्याकडे आहेत.

दक्षिण आफ्रिका टीम टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात भारतात वर्ल्ड कप खेळेल. न्यूझीलंड गेल्या वेळेस उपविजेता होती. त्यामुळे केन विल्यमसन याचं आपल्या कर्णधारपदात न्यूझीलंडला वर्ल्ड चॅम्पियन करण्याचा प्रयत्न असेल. गतविजेता इंग्लंडसमोर वर्ल्ड कप राखण्याचं आव्हान असेल. हे आव्हान जोस बटलर कसं पेलतो याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असेल. तर नेदरलँड्स टीम वर्ल्ड कपमध्ये 12 वर्षानंतर स्कॉट एडवर्ड्स याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आता या 10 संघांपैकी कोणती टीम वर्ल्ड कप उंचावणार हे 46 व्या दिवशीच स्पष्ट होईल.

वेस्टइंडिजची उणीव भासणार

दरम्यान गेल्या 12 वर्ल्ड कपनंतर यंदा पहिल्यांदाच वेस्ट इंडिज स्पर्धेत नसणार आहे. विंडिजला आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पराभूत व्हाव लागलं. तिथेच विंडिजचं वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे यंदा निश्चितच क्रिकेट रसिकांना विंडिजची उणीव भासणार इतकं निश्चित.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.