CWC23 | वर्ल्ड कप 2023 साठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, 2 युवा खेळाडूंना संधी
Australia preliminary World Cup squad | भारतात होणाऱ्या आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
कॅनबेरा | आयसीसी वर्ल्ड कप 2023 ला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने सर्वात आधी संघ जाहीर केला आहे. आयसीसीने प्रिलिमिनरी स्क्वॉडची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 18 खेळाडूंची निवड केली आहे. या 18 खेळाडूंमधूनच 15 जण हे भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहेत. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना यजमान टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाने या 18 सदस्यीय खेळाडूंमध्ये दोन नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये अनकॅप्ड लेग स्पिनर तसेच भारतीय वंशाचा तनवीर सांघा याची निवड करण्यात आली आहे. तसेच ऑलराउंडर आरोन हार्डी यालाही स्थान देण्यात आलं आहे. तर मार्नस लाबुशेन याला वनडे टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचं नेतृत्व करणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कपमधील मॅच ही चेन्नईमधील एन चिदंबरम स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतात वनडे वर्ल्ड कप होणार असल्याने टीममध्ये अधिकाअधिक फिरकी गोलंदाज ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया 18 मधून वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंमध्ये तनवीर सांघा याचा समावेश करणार का, याकडे क्रिरेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया प्रिलिमिनरी टीम
Presenting your 18-player squad for the 2023 ODI World Cup, as well as two lead-in series against South Africa and India! ??? pic.twitter.com/h6jVWYJvMy
— Cricket Australia (@CricketAus) August 7, 2023
18 सदस्यीय टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरोन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.
ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत हीच 18 सदस्यीय टीम असणार आहे. ऑस्ट्रेलिया 7 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज खेळेल. यानंतर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपसाठी 18 खेळाडूंमधून 15 सदस्यीय संघ निवडेल.