Eng vs Nz Cwc 2023 | युवा Rachin Ravindra याचं विस्फोटक अर्धशतक, इंग्लंडला फोढलं
Icc World Cup 2023 England vs New Zealnd Rachin Ravindra Fifty | रचिन रविंद्र याने आपल्या कारकीर्दीतील पहिल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शानदार सुरुवात केलीय. रविंद्रने इंग्लंड विरुद्ध कडक अर्धशतक ठोकलंय.
अहमदाबाद | इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 282 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वहे आणि विल यंग ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र न्यूझीलंडला दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर पहिला झटका लागला. सॅम करन याने विल यंग याला आऊट करत किवींना पहिला धक्का दिला. यंगला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे न्यूझीलंडची 10 बाद 1 अशी स्थिती झाली.
विल यंग आऊट झाल्यानंतर 23 वर्षीय युवा रचिन रविंद्र मैदानात आला. रचिनचा हा वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना. रचिनने डेव्हॉन कॉनव्हेला चांगली साथ दिली. या दोघांनी एकेरी दुहेरी धाव घेतल्या. संधी मिळाली तेव्हा मोठे फटके मारले. पावर प्लेचा या दोघांना चांगला फायदा घेतला. रचिनने पुढे येत फटेकबाजी करायला सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने कॉनव्हे यानेही फटकवायला सुरुवात केली. मात्र रचिन सेट झाल्यानंतर आणखी आक्रमक झाला.
रचिनने इंग्लंडच्या येईल त्या बॉलरला झोडायला सुरुवात केली. अशा प्रकारे रचिनने सिक्स ठोकत आपल्या कारकीर्दीतील वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं. रचिनने सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. रचिनने अवघ्या 36 बॉलमध्ये फिफ्टी केली. या दरम्यान रचिनने 3 खणखणीत षटकार आणि 7 चौकार ठोकले. रचिनने 147 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं.
रचिन रवींद्र याचं अर्धशतक
Fifty in just 36 balls by Rachin Ravindra…!!!
What a stupendous innings by the 23 year old – playing his debut World Cup match and scoring freely against England in India. pic.twitter.com/iuV8efJsuP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि ट्रेन्ट बोल्ट.