CWG 2022 : राष्ट्रकुल सुरू होण्याआधीच कोरोनाचं सावट, भारतीय महिला क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव, आणखी एका खेळाडूला लागण
24 वर्षांनंतर या खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे. या T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून ब गटात भारताला पहिल्या सामन्यात 29 जुलै रोजी विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागणार आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रकुल 2022 स्पर्धा (CWG 2022) सुरू होण्यापूर्वीच भारतीय महिला क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. कोरोना (Corona) व्हायरसच्या संसर्गामुळे टीम इंडियाचा आणखी एक सदस्य बर्मिंगहॅमला रवाना होऊ शकला नाही . पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात टीम इंडियातील कोरोनाची ही दुसरी घटना असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अलीकडेच एका खेळाडूला संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. भारतीय संघ रविवारी 24 जुलैला बंगळुरूहून बर्मिंगहॅमला रवाना झाला. संक्रमित आढळलेल्या दोन्ही खेळाडूंची नावे अद्याप उघड झाली नसली तरी, हे निश्चित आहे की हे दोन्ही क्रिकेटपटू CWG 2022 मध्ये भारताच्या पहिल्या सामन्यात प्रवेश करू शकणार नाहीत. महिला क्रिकेटचा प्रथमच CWG मध्ये समावेश करण्यात आला असून 24 वर्षांनंतर या खेळांमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झालं आहे. या T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असून ब गटात भारताला पहिल्या सामन्यात 29 जुलै रोजी विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करावा लागणार आहे.
बीसीसीआयचं ट्विट
A warm send off for #TeamIndia as they left for Birmingham this morning from Bengaluru. ??? #Birmingham2022 pic.twitter.com/Z6tcR3jcDf
हे सुद्धा वाचा— BCCI Women (@BCCIWomen) July 24, 2022
बीसीसीआय आणि आयओए काय म्हणाले?
या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या एका अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “दुसरा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. हे रवाना होण्यापूर्वी घडलं आहे. दोन्ही खेळाडू भारतातच थांबले आहेत. त्याच वेळी, भारतीय बोर्डाकडून याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितलं गेलं नाही. पण, बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितले की, नियमांनुसार, दोन्ही खेळाडू निगेटिव्ह आले तरच संघात सामील होऊ शकतात.
दुसऱ्या सामन्यातून परतणार का?
म्हणजेच दोन्ही खेळाडू तंदुरुस्त असल्यास 31 जुलैला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सहभागी होऊ शकतात. ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानशिवाय भारताला बार्बाडोसविरुद्धही सामना खेळायचा आहे. याशिवाय यजमान इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे देशही या खेळांचा भाग आहेत. फायनलसह सर्व सामने बर्मिंगहॅम येथील प्रसिद्ध एजबॅस्टन मैदानावर खेळवले जातील.
बंगलोरमध्ये तयारी
या महिन्याच्या सुरुवातीला टीम इंडियानं श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी आपल्या तयारीला वेग दिला. तेव्हापासून हा संघ बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावात गुंतला होता. संघ रवाना होण्यापूर्वी भारतीय कर्णधार हरमनप्रीतने राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याबाबत सांगितले की, ‘आम्हाला याचा अनुभव घेण्याची संधी फारशी मिळत नाही, त्यामुळे ही याबद्दल मोठी गोष्ट.’ उत्सुक आहेत. उद्घाटन समारंभ हा आपल्या सर्वांसाठी एक खास अनुभव असेल.” दरम्यान, राष्ट्रकुल सुरू होण्यापूर्वीच महिला क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं चिंतेचं वातावरण आहे.