Cricket : आयपीएलनंतर डेल स्टेन याला लागली लॉटरी, ‘या’ संघाच्या कोचपदी नियुक्ती!
Cricket News : दिल्ली डेअरडेव्हिल्सचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग शेफर्ड यांची वॉशिंग्टन फ्रीडम संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन याला लॉटरी लागली आहे. डेल स्टेनची मेजर लीग क्रिकेट 2023 च्या आधी वॉशिंग्टन फ्रीडमची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएल 2023 मध्ये डेल स्टेन सनरायझर्स हैदराबाद संघाचाही गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मोइसेस हेन्रिक्सची वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 36 वर्षीय हेन्रिक्सकडे T20 क्रिकेटसाठीचं खास कौशल्य आहे. ऑस्ट्रेलियाची प्रमुख T20 स्पर्धा बिग बॅश लीग (BBL) च्या मागील पाच हंगामात हेन्रिक्सने सिडनी सिक्सर्ससह दोन विजेतेपदे जिंकली आहेत. याशिवाय ग्रेग शेपर्ड यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलं आहे.
दिल्ली डेअरडेव्हिल्सचे माजी मुख्य प्रशिक्षक ग्रेग शेफर्ड यांची वॉशिंग्टन फ्रीडम संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्ससह 4 वर्षांच्या कार्यकाळानंतर बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
डेल स्टेन हा आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. त्यानंतर त्याने गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रतिनिधित्व केलं होत. आताच्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावावर आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वाधिक दिवस नंबर वन राहण्याचा विक्रम आहे. स्टेनने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक 2343 दिवस कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता.
दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस 1719 दिवसांसह दुसऱ्या क्रमांकावर, श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन 1711 दिवसांसह तिसऱ्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 1466 दिवसांसह चौथ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा 1306 दिवसांसह पाचव्या क्रमांकावर आहे.