Dan Christian IPL 2021 RCB Team Player : ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल क्रिस्चियनच्या समावेशाने बंगळुरुची टीम भक्कम
डॅनियल क्रिस्चियनने गेल्या दोन वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. (Dan Christian IPL 2021)
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू डॅनियल क्रिस्चियन याच्यावर तब्बल 4.80 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं आहे. गोलंदाजी ही बंगळुरुच्या संघाची कमकुवत बाजू मानली जाते. परंतु आरसीबीने डॅनियल क्रिस्चियनचा संघात समावेश करुन संघ अधिक मजबूत केला आहे. त्यामुळे बंगळुरुचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये मोठं आव्हान निर्माण करु शकतो.
डॅनियल क्रिस्चियनने गेल्या दोन वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. डॅन क्रिस्चियन हा एक जलदगती गोलंदाज आहे. तसेच तो मधल्या फळीत फलंदाजीदेखील करतो. डॅनने 19 एकदिवसीय आणि 16 टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसेच आतापर्यंत तो 40 आयपीएल सामनेदेखील खेळला आहे. 2017 सालच्या आयपीएलमध्ये त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स तर 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.
डॅनियल क्रिस्चियनची गोलंदाजीतील कामगिरी
डॅनियलने 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 19 डावांमध्ये गोलंदाजी करताना 20 बळी मिळवले आहेत. 31 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच 16 टी-20 सामन्यांमधील 16 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 11 बळी मिळवले आहेत. त्यात 11 धावात 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर 40 आयपीएल सामन्यांमध्ये 40 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 34 बळी मिळवले आहेत. 10 धावा देत 2 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
चेंडू
|
निर्धाव
षटकं
|
धावा
|
विकेट्स
|
सर्वोत्तम
गोलंदाजी
|
Econ
|
Avg
|
SR
|
4W
|
5W
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एकदिवसीय
2012–14
|
19
|
19
|
727
|
4
|
595
|
20
|
5/31
|
4.91
|
29.8
|
36.4
|
0
|
1
|
टी-20
2010–17
|
16
|
16
|
213
|
0
|
317
|
11
|
3/27
|
8.92
|
28.8
|
19.4
|
0
|
0
|
आयपीएल
2011–18
|
40
|
40
|
783
|
0
|
1037
|
34
|
2/10
|
7.94
|
30.5
|
23.0
|
0
|
0
|
डॅनियल क्रिस्चियनची फलंदाजीतील कामगिरी
डॅनियलने 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 डावांमध्ये फलंदाजी करताना 273 धावा जमवल्या आहेत. त्यात त्याला एकही शतक अथवा अर्धशतक फटकावता आलेलं नाही. तसेच 16 टी-20 सामन्यांमधील 7 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने केवळ 27 धावा केल्या आहेत. तर 40 आयपीएल सामन्यांमध्ये 34 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 446 धावा जमवल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमधील या अष्टपैलू खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीत अद्याप छाप पाडता आलेली नाही.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
नाबाद
|
धावा
|
हायस्कोर
|
सरासरी
|
BF
|
BF
|
SR
|
100s
|
50s
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एकदिवसीय
2012–14
|
19
|
18
|
5
|
273
|
39
|
21.0
|
307
|
36
|
88.9
|
0
|
0
|
टी-20
2010–17
|
16
|
7
|
3
|
27
|
9
|
6.8
|
28
|
13
|
96.4
|
0
|
0
|
आयपीएल
2011–18
|
40
|
34
|
9
|
446
|
39
|
17.8
|
374
|
36
|
119.2
|
0
|
0
|
संबंधित बातम्या
Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
(Dan Christian IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)