डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थ, भारताचा विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 237 धावा केल्या.

डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थ, भारताचा विजय
डेव्हिड मिलरचं शतक व्यर्थImage Credit source: social
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 12:05 AM

नवी दिल्ली : गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात भारतानं (Team India) विजय मिळवला आहे. पहिले फलंदाजी करताना भारतानं तीन बाद 237 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात तीन बाद 221 धावाच केल्या आणि टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी विजय मिळवलाय. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता.

प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला.

मिलरचं शतक व्यर्थ

एका क्षणी मिलर आणि डी कॉक भारताकडून हा सामना हिसकावून घेतील असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 106 धावा केल्या. पण, भारताच्या विजयानं त्या व्यर्थ ठरल्या. डेव्हिड मिलरने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. मिलरने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार मारले.

सर्वाधिक 106 धावा

गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात 238 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली आणि दुसऱ्याच षटकातच संघाने दोन विकेट गमावल्या.

क्विंटन डी कॉक आणि मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 46 धावांची भागीदारी झाली.मार्करामला अक्षर पटेलने क्लीन बोल्ड केले, त्याने 19 चेंडूत 33 धावा केल्या.

डी कॉक 48 चेंडूत 69 धावा करून नाबाद राहिला.डी कॉक आणि मिलरने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 37 धावांची गरज होती आणि मिलरने शेवटच्या षटकात अक्षर पटेलविरुद्ध दोन षटकार मारत शतक ठोकले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 237 धावा केल्या. रोहित आणि राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 59 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली.

रोहित 37 चेंडूत 43 धावा करून बाद झाला.त्याचवेळी केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली.त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.