नशेसी चढ गयी… मालदीव्जमध्ये मध्यरात्री धिंगाणा, दारुच्या नशेत वॉर्नर-स्लेटरमध्ये धक्काबुक्की?
मालदीवच्या ताज कोरल या रिसॉर्टमध्ये मध्यरात्री नशेत असलेल्या वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात कुठल्याशा कारणावरुन धक्काबुक्की झाल्याचं वृत्त डेली टेलिग्राफने दिलं आहे. (david warner And Michael Slater Physical Brawl in the Maldives)
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ओपनर बॅट्समन डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि क्रिकेट कॉमेंटेटर मायकल स्टेटर (Michael Slater) यांच्यात मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा पुढचे काही दिवस मालदीवमध्ये मुक्काम असणार आहे. चार दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे सगळे खेळाडू मालदीवला पोहोचले आहेत. तेथून ते आपल्या मायदेशी जाणार आहेत. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास मद्यधुंद असेल्लया वॉर्नर-स्लेटरमध्ये झटापट झाल्याचं वृत्त समोर येत आहे. मात्र असा कुठलाही प्रकार आमच्यामध्ये झाला नसल्याचा दावा वॉर्नर आणि स्लेटर या दोघांनीही केला आहे. (David Warner And Michael Slater Physical Brawl in the Maldives)
नेमका प्रकार काय…?
आयपीएल खेळण्यासाठी आलेले ऑस्ट्रेलियाचे सगळे खेळाडू 14 व्या पर्वाच्या स्थगितीची घोषणा झाल्यानंतर मालदीवला आहेत. पुढील काही दिवस ते मालदीवमध्येच असणार आहेत. याचदरम्यान मालदीवच्या ताज कोरल या रिसॉर्टमध्ये मध्यरात्री नशेत असलेल्या वॉर्नर आणि स्लेटर यांच्यात कुठल्याशा कारणावरुन धक्काबुक्की झाल्याचं वृत्त डेली टेलिग्राफने दिलं आहे.
वादावर वॉर्नर-स्लेटरचं स्पष्टीकरण काय?
आमच्या दोघांमध्ये वाद, धक्काबुक्की झाल्याचं वृत्त काही माध्यमं दाखवत आहेत. मात्र असा कुठलाही प्रकार आमच्यामध्ये झाला नाही. मीडियाला या अशा बातम्या कुठून मिळतात माहिती नाही. आपण पाहिलं नसेल किंवा काही पुरावा नसेल तर आपण असं कसं लिहू शकता?, असं म्हणत वॉर्नरने मीडियावर आपला राग काढला.
या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाहीय. डेवी (डेव्हिड वॉर्नर) आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आमच्यामध्ये भांडणं किंवा झटापट होणं शक्य नाही, असं स्लेटर यांनी माध्यमांना स्पष्टीकरण देताना म्हटलं.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीवमध्ये क्वारन्टाईन
कोरोना व्हायरसने थेट क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री केल्याने बीसीसीआयने महत्तपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला. आयपीएलचं 14 वं पर्व तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. आयपीएल स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी कसे परतणार, यासंबंधी बरीच चर्चा सुरु होती. अखेर चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोच, कॉमेंटेटर सुखरुपपणे भारतातून मालदीवला पोहोचले आहेत. तिथे पुढचे काही दिवस ते क्वारंन्टाईन असणार आहेत.
(David Warner And Michael Slater Physical Brawl in the Maldives)
हे ही वाचा :
‘ओरिजनल फिनिशर कोण?’, बेवनच्या वाढदिवशी आयसीसीने थेट धोनीला ट्रोल केलं, फॅन्स भडकले!