मोठी बातमी IPL 2021 : डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथही मायदेशी परतणार, ऑस्ट्रेलियाची दारं बंद होण्याची भीती!

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिल्लीचा खेळाडू  स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतण्यासंबंधीचं वृत्त आहे. 9 न्यूजच्या रिपोर्टनुसार हे दोघेही खेळाडू आयपीएलचं 14 वं पर्व अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहे. (David Warner and Steve Smith could leave the IPL 2021 Due To Corona Virus in india)

मोठी बातमी IPL 2021 : डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथही मायदेशी परतणार, ऑस्ट्रेलियाची दारं बंद होण्याची भीती!
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिल्लीचा खेळाडू  स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतण्यासंबंधीचं वृत्त आहे. 9 न्यूजच्या रिपोर्टनुसार हे दोघेही खेळाडू आयपीएलचं 14 वं पर्व अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहे.
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 2:48 PM

मुंबई : संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या भीतीच्या वातावरणात आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) सुरु आहे. अशावेळी कुणी आपल्या वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव तर कुणी कुटुंबीयांसाठी आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकतंय. अगोदरच पाच खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशातच यात आणखी दोन मोठ्या खेळाडूंची भर पडतीय. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि दिल्लीचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) मायदेशी परतण्यासंबंधीचं वृत्त आहे. 9 न्यूजच्या रिपोर्टनुसार हे दोघेही खेळाडू आयपीएलचं 14 वं पर्व अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहे. (David Warner and Steve Smith could leave the IPL 2021 Due To Corona Virus in india)

रिपोर्टमध्ये नेमकं काय?

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू देशाच्या सीमा बंद होण्यापूर्वी मायदेशी परतण्याची अपेक्षा करत आहेत. इतकंच नव्हे तर आयपीएलमध्ये उपस्थित असणारे प्रशिक्षक, कॉमेंटेटर तसंच जवळपास 30 ऑस्ट्रेलियन दिग्गज भारतातून मायदेशी परतण्यास उत्सुक आहेत, असे या न्यूज 9 च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाची दारं बंद होण्याची भीती

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इथली परिस्थितीही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. सर्वांत जास्त काळ लॉकडाऊनमध्ये राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये राहावं लागू नये म्हणून ऑस्ट्रेलियन सरकार दक्षता घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकार देशाच्या सीमा सील करण्याच्या विचारात आहे. सरकारने हे पाऊल उचलण्याअगोदर आपण मायदेशी गेलेलं बरं, असा विचार ऑस्ट्रेलियन खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक करत आहेत.

आयपीएल स्पर्धेतून आतापर्यंत किती खेळाडूंनी माघार घेतली?

IPL 2021 स्पर्धेतून आतापर्यंत पाच खेळाडुंनी माघार घेतली आहे. यामध्ये आर. अश्विन, अँड्य्रू टाय, केन रिचडर्सन, अ‍ॅडम झम्पा, लियाम लिव्हिंगस्टोन यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघात असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टाय यानेही IPL 2021 स्पर्धेतून माघार घेतली होती. भारतात कोरोनाचा प्रकोप आणखी वाढल्यास आपल्याला ऑस्ट्रेलियाचे दरवाजे बंद होऊ शकतात, अशी भीती या खेळाडूंना असल्याची चर्चा आहे.

बायो बबलमुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिणाम?

दोन दिवसांपूर्वी बायो बबलला कंटाळून राजस्थानचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन हादेखील माघारी परतला होता. बायो-बबलमध्ये मानसिक कोंडमारा होत असल्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले होते.

इंग्लंडच्या संघाने गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन बिग बॅश लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लियाम लिव्हिंगस्टोन हा बायो बबलमध्ये होता. बायो बबलमुळे जोश हॅझलवूड (चेन्नई), जोशुआ फिलीप (रॉयल चॅलेंजर्स), मिशेल मार्श (हैदराबाद) या खेळाडुंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेला रामराम ठोकला होता.

(David Warner and Steve Smith could leave the IPL 2021 Due To Corona Virus in india)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.