David Warner याची पाकिस्तान विरुद्ध कडक सेंच्युरी, रिकी पॉन्टिंग याच्या विक्रमाची बरोबरी

David Warner Century | डेव्हिड वॉर्नर याने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला आहे. वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

David Warner याची पाकिस्तान विरुद्ध कडक सेंच्युरी, रिकी पॉन्टिंग याच्या विक्रमाची बरोबरी
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 4:47 PM

बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 18 व्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  ऑस्ट्रेलिया टीमकडून बॅटिंगसाठी डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही सलामी जोडी मैदानात आली. या जोडीने सावध सुरुवात करत नंतर टॉप गिअर टाकला. पाकिस्तानने पहिल्याच बॉलवर रिव्हीव्यू गमावला. त्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये उसामा मीर याने वॉर्नरची कॅच सोडत जीवनदान दिलं. वॉर्नरने या संधीचं सोनं करत धमाका केलाय. वॉर्नरने पाकिस्तान विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. वॉर्नरने य शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

वॉर्नरच्या वनडे कारकीर्दीतील हे 21 वं शतक ठरलं. डेव्हिड वॉर्नर याने 85 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वॉर्नरने या दरम्यान 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले. वॉर्नरचं हे वर्ल्ड कपमधील एकूण 5 वं शतक आहे. वॉर्नर वर्ल्ड कपमध्ये वेगवान 5 अर्धशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने 22 डावांमध्ये हा कारमाना केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने वर्ल्ड कपमध्ये 5 शतकं केली आहेत. पॉन्टिंगला यासाठी 42 डाव खेळावे लागले होते.

वॉर्नरला जीवनदान आणि पाकिस्तानचं काम तमाम

दरम्यान डेव्हिड वॉर्नर याला ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. वॉर्नर 10 धावांवर खेळत होता. तर शाहीन शाह अफ्रिदी बॉलिंग करत होता. वॉर्नरने तिसऱ्या बॉलवर मारलेला फटका उंच गेला. उसामा मीर याच्यासाठी सोपा कॅच होता. मात्र मीरने नीट जज न केल्याने कॅच ड्रॉप झाला. मीरची एका चुकीचा फटका पाकिस्तानला फार महागात पडला. तर वॉर्नरने या जीवनदानाचा फायदा घेत शतक केलं. आता वॉर्नर आणखी किती धावा करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असेल.

वॉर्नरची वादळी खेळी

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.