PAK vs AUS | पाकिस्तानचा महागडा खेळाडू,ऑस्ट्रेलिया विरुद्ध लुटवल्या153 धावा
Australia vs Pakistan | पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. कांगारुंच्या गोलंदाजांना ठोकून काढला. मात्र त्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने 153 धावांची लुट केली.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 18 वा सामना ऑस्ट्रेलिया टीमने पाकिस्तानवर 62 धावांनी मात करत जिंकला. डेव्हिड वॉर्नर याच्या 163 आणि मिचेल मार्श याच्या 121 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 368 धावांचं अवघड आव्हान ठेवलं. मात्र पाकिस्ताननेही झोकात सुरुवात करत सामन्यावर आपली घट्ट पकड धरुन ठेवली. पाकिस्तानच्या अब्दुल्लाह शफीक आणि इमाम उल हक या ओपनिंग जोडीने 134 धावांची भागीदारी केली. या दोघांनी कडक सुरुवात केली. मात्र त्यानंतर पाकिस्तानने एकमागोमाग एक ठराविक अंतराने विकेट गमावल्या. अशाप्रकारे पाकिस्तान 45.3 ओव्हरमध्ये 305 धावांवर ऑलआऊट झाली.
पाकिस्तानने ज्या प्रकारे लढत दिली, त्यानुसार पाकिस्तानचा विजय 62 धावांनी हुकला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र पाकिस्तानच्या या पराभवाला त्यांचा एक खेळाडूच जबाबदार ठरलाय, ज्याने तब्बल 152 धावा लुटवल्या. हो हो, 152 धावा. या खेळाडुमुळे पाकिस्तानला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. तो खेळाडू कोण आहे आणि त्याने 152 धावा कशा लुटवल्या हे जाणून घेऊयात.
नक्की काय झालं?
पाकिस्तानने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर ही सलाम जोडी खेळायला आली. या सलामी जोडीने 259 धावांची भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली. खरंतर ही ओपनिंग पार्टनरशीप 22 धावांवरच तुटली असती आणि वॉर्नरला 163 काय 11 धावाही करता आल्या नसत्या. मात्र हे घडलं ते पाकिस्तानच्या एका खेळाडूमुळे. पाकिस्तानच्या एका खेळाडूने तब्बल 153 धावा लुटवल्या ज्या सर्वच्या सर्व डेव्हिड वॉर्नर याच्या खात्यात गेल्या, ते कसं समजून घेऊयात.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला. शादाब खान याच्या जागी उसमा मीर याला संधी दिली. उसामा मीर याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर डेव्हिड वॉर्नर याचा सोपा कॅच सोडला. उसामाने कॅच सोडला तेव्हा वॉर्नर 10 धावांवर खेळत होता. तर वॉर्नरने एकूण 163 धावांची खेळी केली. याचाच अर्थ असा की उसामाने कॅच सोडणं हे पाकिस्तानच्या दुसऱ्या पराभवाचं कारण ठरलं. उसामाने एक कॅच सोडल्याने पाकिस्तानचा पराभव झाला असं म्हटलं तर चुकीं ठरणार नाही. तसेच उसामाने 153 धावा लुटवल्यास ते वावगं ठरणार नाही.
ड्रॉप चान्स
View this post on Instagram
दरम्यान उसामाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंगही केली. उसामाने 9 ओव्हरमध्ये 9.10 च्या इकॉनॉमीने 82 धावा लुटवत एकमेव विकेट घेतली.
153 धावा लुटवल्या
So Usama Mir’s inclusion didn’t help Pakistan anymore:
– Dropped a catch of David Warner on 10 and then Warner added 153 runs – He gave 82 runs in his 9 overs and took only 1 wicket – He grabbed a 🦆 in batting
Who is better? Shadab or Usama#PAKvAUS #PAKvsAUS pic.twitter.com/dieNPNb6SS
— Tanveer Hassan (@tanveercric56_) October 20, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.