World Cup दरम्यान मोठ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, शेवटच्या सामन्यात भारताकडून झालेला पराभव!

World Cup 2023 : वर्ल्ड कप सुरू असताना मोठी बातमी समोर आल आहे. बड्या खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला असून संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

World Cup दरम्यान मोठ्या खेळाडूची निवृत्तीची घोषणा, शेवटच्या सामन्यात भारताकडून झालेला पराभव!
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 3:53 PM

मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बामती समोर आली आहे. वर्ल्ड कप 2023 स्पर्धा अर्ध्यावर असताना मोठ्या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी संघाच्या आशा आधीच मावळल्या असताना स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. संघासाठी अनेकवेळा मॅचविनिंग प्रदर्शन करणाऱ्या या खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

वर्ल्ड कप सुरू असताना इंग्लंड संघासाठी मोठा धक्का आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाचा स्टार खेळाडू डेव्हिड विली याने निवृत्तीची घोषणा केलीये. यंदाच्या वर्ल्ड कपमधून इंग्लंड संघ बाहेर पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत विलीने माहिती दिली आहे.  असा दिवस येईल मला वाटलं नव्हतं, मी लहानपणापासूनच इंग्लंड क्रिकेटसाठी खेळण्याचं स्वप्न पाहत आलो होतो. जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे. सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मी निवृत्ती घेण्याची योग्य वेळ असून मी खूप विचार करून हा निर्णय घेत आहे. वर्ल्ड कपनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नसल्याचं डेव्हिड विली याने म्हटलं आहे.

मी मोठ्या अभिमानाने संघाची जर्सी परिधान करतो. मला क्रिकेटने सर्व काही दिलं असून जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. अनेक कठीण प्रसंगातू गेलो. मला वेळोवेळी पाठिंबा दिल्याबद्दल सर्व मित्रांचे आणि कुटुंबांचे आभार, असं डेव्हिड विलीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये डेविड विली यान तीन सामने खेळले यामध्ये त्याने पाच विकेट घेतल्या. शेवटचा सामना भाराताविरूद्ध खेळला होता त्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या होत्या.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.