DC vs PBKS IPL 2023 Highlights | पंजाब किंग्संचा 31 धावांनी विजय, दिल्ली कॅपिट्ल्सचा बाजार उठला

| Updated on: May 14, 2023 | 12:43 AM

DC vs PBKS IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएल 16 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्लीवर 31 धावांनी विजय मिळवला आहे.

DC vs PBKS IPL 2023 Highlights | पंजाब किंग्संचा 31 धावांनी विजय, दिल्ली कॅपिट्ल्सचा बाजार उठला

नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमात शनिवारी 13 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. आता दुसऱ्या आणि मोसमातील 59 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने होते. या सामन्यात पंजाब किंग्सने 31 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला पंजाबच्या भेदक माऱ्यासमोर 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 136 धावाच करता आल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 13 May 2023 11:12 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब किंग्सचा विजय, दिल्ली ‘आऊट’

    पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर 31 धावांनी विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं.  मात्र पंजाबच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीला चांगल्या सुरुवातीनंतरही 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावाच करता आल्या.  या पराभवामुळे दिल्लीचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलंय. तर पंजाबने विजयासह प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे.

  • 13 May 2023 10:54 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीला आठवा झटका

    दिल्लीला आठवा झटका लागला आहे. प्रवीण दुबे 16 धावांवर आऊट झाला आहे.

  • 13 May 2023 10:25 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | मनीष पांडे आला तसाच गेला

    दिल्लीने पंजाबच्या फिरकी समोर सपशेल नांगी टाकली आहे.  दिल्लीने सहावी विकेट गमावली आहे.  मनीष पांडे आला तसाच गेला.  मनीषला भोपळाही फोडता आला नाही.

  • 13 May 2023 10:21 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबच्या फिरकी गोलंदाजांचा धमाका

    पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी धमाका केलाय. दिल्लीला चांगल्या सुरुवातीनंतर पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी सुरुंग लावलाय.  पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी 17 बॉलमध्ये दिल्ली 5 झटके दिले आहेत.

  • 13 May 2023 10:17 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | डेव्हिड वॉर्नर आऊट, दिल्ली अडचणीत

    दिल्लीने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर 54 धावांची अर्धशतकी खेळी केल्यानंतर आऊट झाला आहे.  हरप्रीत ब्रार यानेच वॉर्नरला एलबीडबल्यू आऊट केला. ब्रारची ही तिसरी विकेट ठरली.

  • 13 May 2023 10:10 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीला तिसरा झटका

    दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. रायली रुसो 5 धावांवर कॅच आऊट झाला आहे. यासह पंजाब किंग्सने सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे.

  • 13 May 2023 10:06 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीला दुसरा झटका, मिचेल मार्श आऊट

    राहुल चाहर याने दिल्लीला दुसरा धक्का दिला आहे. राहुलने मिचेल मार्श याला 3 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

  • 13 May 2023 10:04 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | डेव्हिड वॉर्नर याचं अर्धशतक

    दिल्ली कॅपिटल्स कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने अवघ्या 23 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे. वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीतील 60 वं अर्धशतक ठरलं आहे. तसेच वॉर्नरने पंजाब विरुद्ध 1 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला आहे.

  • 13 May 2023 09:59 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीला पहिला धक्का

    हरप्रीत ब्रार याने दिल्ली कॅपिट्ल्सची जमलेली सलामी जोडी तोडली आहे. हरप्रीतने फिलिप सॉल्ट याला 21 धावांवर क्लिन बोल्ड करत पंजाबला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

  • 13 May 2023 09:52 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीची धमाकेदार सुरुवात

    दिल्ली कॅपिट्ल्सची शानदार सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट या सलामी जोडीने  5 ओव्हरमध्ये 53 धावा करत सलामी अर्धशतकी भागीदारी साकारली.

  • 13 May 2023 09:27 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात

    दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवा झाली आहे. दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान आहे. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर आणि फिलिप सॉल्ट ही सलामी जोडी खेळत आहे.

  • 13 May 2023 09:13 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान

    पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं आहे.  पंजाबने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या.  पंजाबकडून प्रभासिमरन सिंह याने सर्वाधिक 103 धावा केल्या. सॅम करन याने 20 तर सिंकदर रजा याने नाबाद 11 धावा केल्या.  या दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि मुकेश कुमार या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 13 May 2023 09:03 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | प्रभासिमरन सिंह आऊट

    प्रभासिमरन सिंह शतक ठोकल्यानंतर आऊट झाला आहे. प्रभाने 65 बॉलमध्ये 6 सिक्स 10 फोरच्या मदतीने 103 धावा केल्या.  प्रभाचं हे आयपीएलमधील पहिलंवहिलं शतक ठरलं.

  • 13 May 2023 08:58 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | प्रभासिमरन सिंह याचं शतक

    प्रभासिमरन सिंह याने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं आहे. प्रभासिमरन सिंह याने अवघ्या 61 बॉलमध्ये 102 धावांची शतकी खेळी केली. प्रभासिमरन पंजाबकडून शतक ठोकणारा 14 वा तर तिसरा अनकॅप्डन बॅट्समन ठरला आहे. पॉल वॅलथॅटी आणि शॉन मार्श यांच्यानंतर प्रभासिमरन तिसरा अनकॅप्ड बॅट्समन ठरला आहे.

  • 13 May 2023 08:49 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला पाचवा झटका

    पंजाबने पाचवी विकेट गमावली आहे. हरप्रीत ब्रार 2 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 13 May 2023 08:41 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला चौथा धक्का

    पंजाबला मोठा झटका लागला आहे. पंजाबने चौथी विकेट गमावली आहे. सॅम करन 20 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 13 May 2023 08:30 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | प्रभासिमरन सिंह याचं अर्धशतक

    प्रभासिमरन सिंह याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. प्रभासिमरन याचं हे आयपीएल 16 व्या मोसमातील दुसरं अर्धशतक ठरलंय. प्रभासिमरन याच्या अर्धशतकामुळे पंजाबचा डाव सावरला आहे.

  • 13 May 2023 08:01 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब पावर प्लेमध्ये पुन्हा अपयशी

    पंजाब किंग्स पावर प्लेमध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. पंजाबने तिसरी विकेट गमावली आहे. पंजाबची पावर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावण्याची चौथी वेळ ठरली आहे.  अक्षर पटेल याने जितेश शर्मा याला आऊट करत पंजाबला तिसरा धक्का दिला आहे.  त्यामुळे पंजाबची 5.4 ओव्हरमध्ये 3 बाद 45 अशी स्थिती झाली आहे.

  • 13 May 2023 07:52 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला दुसरा धक्का

    इशांत शर्मा याने पंजाब किंग्सला दुसरा झटका दिला आहे.  इशांतने लियाम लिविंगस्टोन याला 4 धावांवर क्लिन बोल्ड केलं आहे.

  • 13 May 2023 07:47 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबला पहिला धक्का

    पंजाब किंग्सने मोठी विकेट गमावली आहे.  इशंता शर्मा याने आपल्या 100 व्या सामन्यात पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याला 7 धावांवर आऊट केलं आहे.

  • 13 May 2023 07:33 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

    पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. प्रभासिमरन सिंह आणि कॅप्टन शिखर धवन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 13 May 2023 07:32 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन

    पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

  • 13 May 2023 07:30 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

  • 13 May 2023 07:06 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला

    दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे.  कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स दिल्लीला घरच्या मैदानात किती धावांचं आव्हान देणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 13 May 2023 05:52 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने?

    दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्स या मोसमात प्रथमच आमनेसामने आहेत. याआधी आयपीएलमध्ये दोघांमध्ये 30 वेळा सामना झाला आहे. यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ राहिले आहेत. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 15-15 सामने जिंकले आहेत.

  • 13 May 2023 05:49 PM (IST)

    DC vs PBKS IPL 2023 Live Score | दिल्ली विरुद्ध पंजाब आमनेसामने

    दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स हे दोन्ही संघ या मोसमात पहिल्यांदा आमनेसामने असणार आहेत.  दिल्लीचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलंय.  मात्र पंजाबला अजूनही संधी आहे. त्यामुळे पंजाबला दिल्लीपासून जपून रहावं लागणार आहे. पंजाबचा हा सामना जिंकून प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.

Published On - May 13,2023 5:44 PM

Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.