DC vs PBKS, IPL 2021 Match 11 Result | ‘गब्बर’ शिखर धवनची शानदार खेळी, दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय
DC vs PBKS 2021 Live Score | दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने
मुंबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (Delhi Capitals) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली. तर पृथ्वी शॉने 32 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयिनसने नाबाद 27 धावांची खेळी केली. (dc vs pbks live score ipl 2021 match delhi capitals vs punjab kings scorecard online wankhede stadium mumbai in marathi)
DC vs PBKS लाईव्ह स्कोअरकार्डसाठी क्लिक करा.
LIVE NEWS & UPDATES
-
दिल्लीचा 6 विकेट्सने दणदणीत विजय
दिल्लीने पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लाने 18.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 92 धावांची शानदार खेळी केली. तर पृथ्वी शॉने 32 धावा केल्या. तर मार्क्स स्टोयिनसने नाबाद 27 धावांची खेळी केली.
Match 11. It's all over! Delhi Capitals won by 6 wickets https://t.co/LYbGVgrfCn #DCvPBKS #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
दिल्लीला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 8 धावांची आवश्यकता
-
-
दिल्लीला चौथा धक्का
दिल्लीला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार रिषभ पंत आऊट झाला आहे.
-
दिल्लीला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 16 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 3 ओव्हरमध्ये 16 धावांची आवश्यकता
-
स्टोयनिसचा शानदार सिक्स
मार्क्स स्टोयनिसने फ्री हीटचा चांगला फायदा उचलला आहे. मोहम्मद शमीने 17 व्या ओव्हरमधील तिसरा चेंडू नो बोल टाकल्याने फ्री हीट मिळाला. या फ्री हीटवर स्टोयनिसने सिक्स लगावला.
-
-
दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार रिषभ पंत आणि मार्कस स्टोयनिस मैदानात खेळत आहेत. सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
-
दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता
दिल्लीला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार रिषभ पंत आणि मार्कस स्टोयनिस मैदानात खेळत आहेत.
-
दिल्लीला तिसरा धक्का
दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. सलामीवीर शिखर धवन 92 धावा करुन माघारी परतला आहे. अवघ्या 8 धावांनी शिखर धवनचे शतक हुकले.
-
गब्बरचे सलग 3 चौकार
गब्बर शिखर धवनने सलग 3 चेंडूत 3 चौकार लगावले आहेत.
-
दिल्लीचा 13 ओव्हरनंतर स्कोअर
दिल्लीने 13 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 125 धावा केल्या आहेत. शिखर धवन 78 आणि कर्णधार रिषभ पंत 4 धावांवर खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी 42 चेंडूत 71 धावांची आवश्यकता आहे.
-
दिल्लीला दुसरा धक्का
दिल्लीला दुसरा धक्का बसला आहे. स्टीव्ह स्मिथ आऊट झाला आहे.
-
दिल्लीच्या 100 धावा पूर्ण
दिल्लीच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. दिल्लीने 61 चेंडूत म्हणजेच 10.1 ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा गाठला आहे.
-
दिल्लीचा 10 ओव्हरनंतर स्कोअर
दिल्लीने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 99 धावा केल्या आहे. मैदानात शिखर धवन 58 आणि स्टीव्ह स्मिथ 8 धावांवर नाबाद खेळत आहेत. दिल्लीला विजयासाठी आणखी 60 चेंडूत 97 धावांची आवश्यकता आहे.
-
‘गब्बर’ धवनचे शानदार अर्धशतक
‘गब्बर’ शिखर धवनने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. धवनने 31 चेंडूंच्या मदतीने ही अर्धशतक झळकावलं आहे.
-
शिखरचा शानदार फोर
शिखर धवनने 8 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर फोर लगावला आहे. यासह धवन 37 धावांवर पोहचला आहे. तर 8 ओव्हरनंतर दिल्लीचा स्कोअर 1 आऊट 75 असा झाला आहे. दिल्लीला विजयासाठी 12 ओव्हरमध्ये 121 धावांची आवश्यकता आहे.
-
दिल्लीचा 7 ओव्हरनंतर स्कोअर
दिल्लीने पहिल्या 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 68 धावा केल्या आहेत. शिखर धवन 32 तर स्टीव्ह स्मिथ 3 धावांवर खेळत आहेत.
-
दिल्लीला पहिला धक्का
चांगल्या सुरुवातीनंतर दिल्लीला पहिला झटका बसला आहे. लोकल बॉय पृथ्वी शॉ आऊट झाला आहे. पृथ्वीने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 सिक्ससह 32 धावांची खेळी केली.
-
पृथ्वी शॉ-शिखर धवन सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
दिल्लीच्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामी जोडीने दिल्लीला चांगली सुरुवात दिली आहे. या ओपनर जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
The @DelhiCapitals have got off to a flying start with a fine 50-run partnership between @SDhawan25 & @PrithviShaw.
Live – https://t.co/wbefi7u3wk #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/p71DVzgFv8
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
पृथ्वीचा क्लासिक सिक्स
पृथ्वी शॉने चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शानदार सिक्स लगावला आहे. यासह पृथ्वी 31 धावांवर पोहचला आहे.
-
दिल्लीची जबरदस्त सुरुवात
दिल्लीच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीने पहिल्या 3 ओव्हरमध्ये फटकेबाजी करत 33 धावा जोडल्या आहेत. पृथ्वी 20 तर शिखर 11 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
शिखर धवनचा पहिला चौकार
दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून खातं उघडलं आहे.
-
दिल्लीला विजयासाठी 196 धावांचे आव्हान
पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावा केल्या. पंजाबच्या सलामी जोडीने शानदार कामगिरी केली. मयंक अग्रवालने सर्वाधिक 69 तर कर्णधार के एल राहुलने 61 धावांची खेळी केली.
-
पंजाबला चौथा धक्का
पंजाबला चौथा धक्का बसला आहे. निकोलस पूरन आऊट झाला आहे.
-
पंजाबच्या 18 ओव्हरनंतर 170 धावा
पंजाबने 18 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या आहेत.
-
पंजाबला तिसरा धक्का
पंजाबला तिसरा धक्का बसला आहे. ख्रिस वोक्सने ख्रिस गेलला रिपल पटेलच्या हाती कॅच आऊट केलं. गेलने 11 धावा केल्या.
-
फ्री हीटवर गेलचा सिक्स
ख्रिस गेलने फ्री हीटचा पुरेपुर फायदा घेतला आहे. ख्रिस वोक्सने 17 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू नो बॉल टाकला. त्यामुळे फ्री हीट मिळाला. या फ्री हीटवर गेलने सिक्स लगावला.
-
पंजाबला दुसरा धक्का
पंजाबने दुसरी विकेट गमावली आहे. कर्णधार के एल राहुल आऊट 61 धावा करुन आऊट झाला आहे.
Match 11. 15.2: WICKET! KL Rahul (61) is out, c Marcus Stoinis b Kagiso Rabada, 141/2 https://t.co/LYbGVgrfCn #DCvPBKS #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
पंजाबच्या 15 ओव्हरनंतर 140 धावा
पंजाबने 15 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 140 धावा केल्या आहेत. मैदानात के एल राहुल आणि ख्रिस गेल खेळत आहेत. त्यामुळे ही जोडी उर्वरित 5 ओव्हरमध्ये किती धावा जोडतात, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
-
के एल राहुलला मार्कस स्टोयनिसकडून जीवनदान
मार्कस स्टोयनिसने के एल राहुलला जीवनदान दिलं आहे.
-
कर्णधार के एल राहुलचे संयमी अर्धशतक पूर्ण
कर्णधार के एल राहुलने संयमी अर्धशतक पूर्ण केलं आहे. 6 चौकार आणि 1 सिक्ससह अर्धशतक लगावलं आहे.
A FIFTY for the birthday boy here at The Wankhede.
Live – https://t.co/wbefi7u3wk #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/cjjN05rKFD
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
पंजाबला पहिला धक्का
लुकमन मेरीवालाने आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. मेरीवालाने सेट बॅट्समन मयंक अग्रवालला आऊट केलं आहे. मयंकने 36 चेंडूत 7 चौकार 4 षटकारांसह 69 धावांची खेळी केली.
Meriwala with his first #VIVOIPL wicket.
Mayank Agarwal looks to go big, but finds Shikhar in the deep.
Live – https://t.co/wbefi7u3wk #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/Espsb5nGkt
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
मयंकचे सलग 2 सिक्स
मयंक अग्रवालने सलग 2 चेंडूत कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर 2 सिक्स लगावले आहेत. यासह पंजाबने 100 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच 100 धावांची सलामी भागीदारीही पूर्ण झाली आहे.
-
मयंक अग्रवालचे शानदार अर्धशतक
मयंक अग्रवालने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. मयंकच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 8 वं अर्धशतक ठरलं आहे.
FIFTY!
A quick-fire half-century for @mayankcricket off 25 deliveries.
His 8th in #VIVOIPL
Live – https://t.co/wbefi7u3wk #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/tODO8KNP7h
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
पंजाबच्या पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 59 धावा
पंजाबने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 59 धावा केल्या आहेत.
A powerful start in the powerplay for @PunjabKingsIPL with 59/0 on the board.
Live – https://t.co/LYbGVgrfCn #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/9bx4kUCpZb
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
पंजाबच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
पंजाबची शानदार सुरुवात झाली आहे. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
The @PunjabKingsIPL openers going strong with a 50-run partnership between them ??
Live – https://t.co/wbefi7u3wk #DCvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/kNmleN055D
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2021
-
मयंकची शानदार सुरुवात
पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार सुरुवात केली आहे. मंयकने 11 चेंडूत 5 चौकार 1 सिक्ससह नाबाद 28 धावा चोपल्या आहेत.
-
स्टीव्ह स्मिथकडून केएल राहुलला जीवनदान
स्टीव्ह स्मिथने केएल राहुलला जीवनदान दिलं आहे. लुकमन मेरीवाला सामन्यातील दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर केएलने मारलेला फटका स्टीव्हच्या दिशेने गेला. मात्र स्टीव्हने सोपा कॅच सोडला. त्यामुळे केएलला जीवनदान मिळालं.
-
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. के एल राहुल आणि मयंक अग्रवाल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे.
-
पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
केएल राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, जाय रिचर्डसन, जलज सक्सेना, मोहम्मद शमी, राइली मेरिडिथ आणि अर्शदीप सिंह
-
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत, मार्कस स्टोयनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, अवेश खान, लुकमान मेरीवाला
-
नाणेफेक जिंकून दिल्लीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
उभयसंघ आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब वरचढ राहिली आहे. पंजाबने दिल्लीवर 15 वेळा विजय मिळवला आहे. तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे.
-
दिल्ली विरुद्ध पंजाब आमनेसामने
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 11 व्या लढतीत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.
? ???????? ????? ?
Always a high-octane clash when we meet, time to go all guns blazing against our neighbours again ?#YehHaiNayiDilli #DCvPBKS #IPL2021 @RishabhPant17 @klrahul11 pic.twitter.com/6QEtx1YIWJ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 18, 2021
Published On - Apr 18,2021 11:19 PM