DC vs RCB IPL 2022 Head to Head: आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात कोणाचं पारडं जड?
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. एकाच दिवसात दोन सामने पाहण्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भिडणार आहेत.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) शनिवार हा डबल हेडरचा दिवस आहे. एकाच दिवसात दोन सामने पाहण्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे, तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर भिडणार आहेत. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाची स्थिती फार चांगली नाही. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत तर दोन सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे, जर आपण आरसीबीबद्दल बोललो तर, पाच सामन्यांपैकी तीनमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यावेळी आरसीबीचा संघ आपला नवा कर्णधार फाफ डू प्लेसिससह मैदानात उतरला आहे. त्याचबरोबर दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंत आहे. उभय संघांमधील हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वानखेडेवर गेल्या पाचपैकी चार सामन्यात संघाने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत विजय मिळवला आहे, त्यामुळे या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका निभावेल. दोन्ही संघांमधील सामन्यांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे तर ते आरसीबी या विजयाचा मोठा दावेदार असल्याचे मानले जात आहे.
आरसीबीची पारडं जड
आयपीएलमध्ये RCB आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहेत. आरसीबीने 27 पैकी 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने केवळ 10 सामने जिंकले आहेत. गेल्या हंगामाबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दोन्ही वेळा विजय मिळवला होता. यावर्षी झालेल्या महा लिलावानंतर संघांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे सामन्याच्या निकालात बदल होऊ शकतो.
गेल्या मोसमात दिल्लीचा दोन्ही सामन्यात पराभव
गेल्या वेळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी हे संघ आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 164 धावा केल्या. संघाकडून सलामीवीर शिखर धवनने 43 आणि पृथ्वी शॉने 48 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर आरसीबीने हा सामना जिंकला होता. या सामन्यात केएल भरतने नाबाद 78 तर ग्लेन मॅक्सवेलने 51 धावा केल्या. 2020 मध्ये दिल्लीने आरसीबीचा शेवटचा पराभव केला होता. संघाच्या गुणतालिकेतल्या स्थितीनुसार, पंतला आज कोणत्याही परिस्थितीत आरसीबीविरुद्ध विजय मिळवायचा आहे.
इतर बातम्या
Purple Cap 2022 : पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे, जाणून घ्या कोणते खेळाडू आहेत टॉप 10 मध्ये
IPL 2022, SRH vs KKR : आज कोलकाता विरुद्ध हैदराबाद सनराइजर्स सामना, कोलकाता दुसरं स्थान कायम राखणार?