रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा (RCB vs DC) 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नाबाद 66, ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) 55 शाहबाज अहमद नाबाद 32 आणि जोश हेझलवूड यांनी आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 189 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 190 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण त्यांनी निर्धारित 20 षटकात सात बाद 173 धावा केल्या. RCB चा मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. आजच्या विजयाने त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने आज दिल्ली कॅपिटल्सचा 16 धावांनी पराभव केला. RCB चा यंदाच्या सीजनमधील हा चौथा विजय आहे. दिल्लीचा तिसरा पराभव आहे.
Today’s chants at the Wankhede,
First innings: DK! DK! ?
Second innings: VK! VK! ?#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #DCvRCB— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 16, 2022
हर्षल पटेलने 18 व षटक टाकलं. दिल्लीच्या सहा बाद 156 धावा झाल्या आहेत. शार्दुलने या ओव्हरमध्ये एक षटकार मारला. शार्दुल 17 आणि अक्षर पटेल तीन धावांवर खेळतोय.
चांगली फलंदाजी करणारा ऋषभ पंत 34 धावांवर आऊट झाला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर विराटने त्याचा जबरदस्त झेल घेतला. 17 षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या सहा बाद 145 धावा झाल्या आहेत.
16 षटकात दिल्लीच्या पाच बाद 134 धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत 26 आणि शार्दुल ठाकूरची 7 जोडी मैदानात आहे. ऋषभ आणि शार्दुल धावांवर खेळतोय.
12 षटकात दिल्लीच्या दोन बाद 95 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर 66 धावांवर आऊट झाला. हसरंगाने त्याला पायचीत पकडलं. वॉर्नरने चार चौकार आणि पाच षटकार लगावले.
पावरप्लेच्या सहा षटकात दिल्लीच्या एक बाद 57 धावा झाल्या आहेत. डेविड वॉर्नर 38 धावांवर खेळतोय.
दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली होती. 4.4 षटकात त्याच्या 50 धावा झाल्या आहेत. पण त्याचवेळी मोहम्मद सिराजने सलामीवीर पृथ्वी शॉ ला अनुज रावतकरवी झेलबाद केलं. त्याने 16 धावा केल्या.
दोन षटकात दिल्लीच्या बिनबाद 19 धावा झाल्या आहेत. वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही सलामीची जोडी मैदानात आहे.
दिनेश कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार आहेत. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. शाहबाज अहमद 32 धावांवर नाबाद राहिला.
18 व षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीची दिनेश कार्तिकने वाट लावली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4,4,4,6,6,4, 28 धावा वसूल केल्या.
15 षटकात RCB च्या पाच बाद 115 धावा झाल्या आहेत. शाहबाज अहमद 15 आणि दिनेश कार्तिक 13 धावांवर खेळतोय.
हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुंडाळलं. मॅक्सवेलन 34 चेंडूत 55 धावा केल्या. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत. आरसीबीच्या 11.2 षटकात पाच बाद 92 धावा झाल्या आहेत.
11 षटकात आरसीबीच्या चार बाद 91 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे. तो 33 चेंडूत 55 धावांवर खेळतोय. यात सात चौकार आणि दोन षटकार आहेत.
Marking his 1️⃣0️⃣0️⃣th IPL match in style. ?
Keep going, @Gmaxi_32! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #DCvRCB pic.twitter.com/BWFjepjLyW
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 16, 2022
अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपचा फटका खेळताना सुयश प्रभूदेसाई सहा धावांवर आऊट झाला. कुलदीप यादवने हा झेल घेतला. 9.3 षटकात आरसीबीच्या चार बाद 75 धावा झाल्या आहेत.
नवव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर 4,4,6,6,2,1 असा प्रहार केला. त्याने तब्बल 23 धावा लुटल्या.
RCB ला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली ललित यादवच्या थ्रो वर 12 धावांवर रन आऊट झाला. 6.2 षटकात आरसीबीच्या तीन बाद 40 धावा झाल्या आहेत.
पावरप्लेच्या सहा षटकात RCB च्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल 19 आणि विराट कोहली 12 धावांवर खेळतोय.
आरसीबीला मोठा झटका. कॅप्टन फाफ डू प्लेसिस 8 धावांवर आऊट. खलील अहमदने पटेलकरवी झेलबाद केलं. तीन षटकात आरसीबीच्या दोन बाद 17 धावा झाल्या आहेत.
We’re all dancing like Khaleel because he has got FAF ??
The RCB skipper is back in the ?#DCvRCB pic.twitter.com/wChiJaBjSb
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2022
आरसीबीला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर अनुज रावतला शार्दुल ठाकूरने शून्यावर पायचीत केलं. दोन षटकात आरसीबीच्या एक बाद 12 धावा झाल्या आहेत.
Shardul comes and does a Lord ?
A wicket off his first ball! Anuj Rawat goneeee ??#DCvRCB
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2022
फाफ डू प्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि मोहम्मद सिराज
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत, रोव्हमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद