Video : ‘रोहित शर्माची ‘ही’ एक गोष्ट राजकारणी लोकहो तुम्ही शिका’, विधानसभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचं जगभरात कौतुक होत आहे. रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरलं, रोहित एक कॅप्टन म्हणून कसा आहे ते सर्व खेळाडू सांगतात. याचाच धागा पकडत फडणवीसांनी सभागृहात त्याची एक गोष्ट सर्वांना शिकून घ्यायला सांगितली आहे.

Video : 'रोहित शर्माची 'ही' एक गोष्ट राजकारणी लोकहो तुम्ही शिका', विधानसभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 7:13 PM

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशी आली आहे. मुंबईमधील मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा जनसागर स्वागतासाठी आल्याचं सर्व जगाने पाहिलं. त्यानंतर टीम इंडियामधील महाराष्ट्रीय चार खेळाडूंचा आज विधानसभेमध्ये सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवन दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रत्येकी 1 कोटी रूपये दिले. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रूपयांची घोषणा केली. विधानसभेच्या सभागृहात एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या भाषणात सर्वांचं कौतुक केलं. यावेळी फडणवीसांनी रोहित शर्माचं कौतुक करताना त्याची एक गोष्ट सर्व नेत्यांना शिकायला लावली आहे.

एक कॅप्टन म्हणून रोहितने आपली प्रतिभा उभी केली. रोहितने आपल्याला आनंद आणि दु:ख दिलं, वर्ल्ड कपही जिंकत आनंद आणि निवृत्ती घेत दु:खही दिलं. भारतीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंची यादी आहे ज्यांच्याशिवाय भारतीय क्रिकेट पूर्ण होत नाही त्या यादीत आता रोहितचं नाव गेलं आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव आणि धोनीनंतर रोहित तिसरा कर्णधार ठरला आहे. माझा राजकीय लोकांना एक सल्ला आहे, पत्रकार परिषदेमध्ये कमीत कमी बोलून आपल्या बॉडी लँग्वेजमधून उत्तर कसं देता येतं हे रोहितकडून शिकता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पाहा व्हिडीओ:-

टी-20 चा जगातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. 50  सामने जिंकत सर्वाधिक विजय रोहितच्या नावावर आहेत. इतकंच नाहीतर रोहितने सर्वाधिक धावा, शतके आणि भागीदारी असे अनेक विक्रम केले आहेत. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहितने कॅप्टन म्हणून मिळवलेला विश्वास. टीममधील प्रत्येक खेळाडू रोहितविषयी आदराने आणि प्रेमाने बोलतो. त्यामुळे मला वाटतं की कोणालाही लीड करायचं असेल त्याने हे शिकलं पाहिजे की टीममधील प्रत्येक खेळाडूला विश्वास पाहिजे की, आमचा कॅप्टन विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. हे सर्व रोहितच्या वागण्यातून दिसून येतं, त्यामुळे एक उत्तम कॅप्टनची परंपरा आहे त्याला रोहितने चार चाँद लावण्याचं काम रोहितने केलं असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रोहितचं कौतुक केलं.

Non Stop LIVE Update
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.