Dinesh Karthik : डेब्यू ते निदहास ट्रॉफी, जाणून घ्या तीन खास गोष्टी, ज्याने दिनेशची कामगिरी उठून दिसते
दिनेश कार्तिकची पहिली महत्वाची कामगिरी ही भारताच्या पहिला टी-20मधील आहे.
नवी दिल्ली : धोनी धोनी करणारा क्रिकेटप्रेमी (Cricket) हळूहळू विराट-विराट बोलू लागला. इतक्यात रोहित-रोहित आवाजही जोरात आला. पण जर तुम्ही सध्या क्रिकेट विश्वात काय चाललंय असा प्रश्न कराल. तर तुम्हाला दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) हे नाव पहिल्यांदा ऐकायला मिळेल. सगळीकडे दिनेशचीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया असो वा कोणत्याही कट्ट्यावर पाहा. फक्त दिनेश दिनेश आणि दिनेशच. असं म्हणतात योग्यवेळ आली की सगळ्या गोष्टी होतात. 16 वर्षांपूर्वी भारताकडून (Team India) पदार्पण करतानाही दिनेशनं असं काही केलंय की त्याची चर्चा आजही सर्वत्र रंगली होते. का त्याला टीम इंडियाचा फिनिशर म्हटलं जातं. का सगळीकडे डीकेची चर्चा आहे. याचविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
16 वर्ष कमी नाही. यामध्ये एक पिढी मोठी होते. दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतकीच वर्ष खेळली आहे. त्यानं इतकी वर्षा आपली कामगिरी दाखवली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भारताला आणि विशेषत:तरुण भारताला दिनेश कार्तिकशी संबंधित तीन गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आता तुम्ही विचार करत असाल की त्या तीन गोष्टी काय आहे, तर चला पाहुया…
भारताच्या पहिला टी-20चा हिरो
दिनेश कार्तिकची पहिली महत्वाची कामगिरी ही भारताच्या पहिला टी-20मधील आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे 2006मध्ये झाला होता. यामध्ये दिनेश कार्तिकनं पदार्पण केले होते. या सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी भारतासमोर दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी 127 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. ते दिनेश कार्तिकनं दमदार खेळीच्या जोरावर गाठलं, पदार्पण करताना कार्तिकनं या सामन्यात 28 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. यावेळी दिनेश खूप लोकप्रिय झाला होता.
निदहास ट्रॉफीच्या अंतिम सामना जिंकला
दिनेश कार्तिकच्या धाडसाची दुसरी स्टोरी 2017-18मध्ये खेळल्या गेलेल्या निदहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्याशी संबंधित आहे. त्या सामन्यात भारताला विजेतेपदासाठी शेवटच्या 12 चेंडूत 34 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत अवघ्या 8 चेंडूत नाबाद 29 धावा करत दिनेश कार्तिक सामन्याचा हिरो ठरला. 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं 8 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकार लगावले.
निदहास ट्रॉफीमधील सिक्सर पाहा
Dinesh Karthik famous six in Nidahas trophy final.pic.twitter.com/PYLqsuXlji
— Cricket Addictor (@AbdullahNeaz) May 22, 2022
27 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 55 धावा
दिनेश कार्तिकची तिसरी आणि सर्वात अलीकडील म्हणजे ताजी कामगिरी आताची आहे. जी काल म्हणजे 17 जूनच्या संध्याकाळी त्यानं केली आहे. शेवटच्या पाच षटकात भारतानं 73 धावा केल्या. यामध्ये दिनेश कार्तिकनं महत्वाची भूमिका बजावली आहे. याचा परिणाम असा झाला की सामन्यात टीम इंडियानं 169 धावा केल्या . 203 प्लसच्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या दिनेश कार्तिकनं 27 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 55 धावा केल्या. दिनेश कार्तिकचे हे टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले अर्धशतक आहे.