SA vs IND | आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका, दोन स्टार बॉलर बाहेर, BCCI ने दिली माहिती

Team India Star Player Ruled out test series against south africa : टीम इंडियासाठी वाईट बातमी आहे. संघातील दोन स्टार बॉलर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे संघाची ताकद कमी झाली आहे. कोण आहेत ते दोन बॉलर जाणून घ्या.

SA vs IND | आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका, दोन स्टार बॉलर बाहेर, BCCI ने दिली माहिती
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 3:54 PM

मुंबई : टीम इंडिया साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असून टी-20 मालिका संपली आहे. तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली आहे. त्यानंतर 17 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून वन डे मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेला सुरूवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे एक नाहीतर दोन बॉलर हे बाहेर झालेत. याबाबत बीसीसीयआयने अधिकृत घोषणा केलीये. मालिकेला सुरूवात होण्याआधीच टीममधील हुकमी एक्का असलेले बॉलर बाहेर झाल्यामुळे संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत ते दोन बॉलर?

साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेआधी संघाचा हुकमी एक्क असलेला मोहम्मद शमी याला वगळण्यात आलं आहे. कसोटी संघ जाहीर झाला तेव्हा शमीच्या फिटनेसवर त्याचा सहभाग अवलंबून असल्याचं सांगितलं होतं. शमीच्या फिटनेसबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. शमीच्या जागी बदली खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आलीय याबाबत बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूच्या नावाची घोषणा केली नाही.

रविवारपासून सुरू होणाऱ्या वन मालिकेमध्ये दीपक चहर याने आपलं नाव मागे घेतलं आहे. कुटंबातील खासगी कारणामुळे त्याने आपलं नाव मागे घेतल्याची माहिती सजमत आहे. दीपक चहरच्या जागी संघात आकाश दीप याचा समावेश केला आहे. त्यासोबतच श्रेयस अय्यर शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआने सांगितलं आहे. पहिल्या कसोटीनंत श्रेयस कसोटी संघात सामील होणार आहे.

दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (C), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (WK), केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (VC), प्रसीध कृष्णा.

तीन वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (WK), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.