Team India : टीम इंडियाच्या पराभवानंतर दीप्ती शर्माला मिळाली नवीन जबाबदारी
सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघाची खेळाडू दीप्ती शर्माकडे मोठी जबबादारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई : टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पराभूत करत ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा राहून तर गेलाच त्यासोबतच परत ट्रॉफी मिळवण्यासाठी आता वाट पाहावी लागणार आहे. सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघाची खेळाडू दीप्ती शर्माकडे मोठी जबबादारी सोपवण्यात आली आहे.
यूपी वॉरिअर्स संघाने ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एलिसा हिलीकडे नेतृत्त्वपदाची धुरा सोपवली आहे. तर आता दीप्ती शर्माकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दीप्ती शर्मासाठी 2.6 कोटी खर्च केले होते. त्यामुळे सर्वांना वाटत होतं की संघाचं कर्णधारपद दीप्तीकडे जाईल मात्र संघ व्यवस्थापनाने एलिसा हिलीकडे ते दिलं आहे.
भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचवण्यापर्यंत दीप्तीने चांगलं प्रदर्शन केलं होतं. पाच सामन्यांत एकूण सहा विकेट घेतल्या. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. त्याचबरोबर तिने वेस्ट इंडिजविरुद्ध तीन यश मिळवले होते. इंग्लंडविरुद्ध तिला फक्त एकच विकेट घेता आली होती.
एलिसा हिलीची वक्तव्य:
मी पहिल्यांदा होणाऱ्या वुमन्स आयपीएल लीग स्पर्धेची उत्सुकतेने वाट पाहत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली याचा मला अभिमान आहे. आमचा संघ संतुलित असून ही स्पर्धा जिंकण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न करू, असं एलिसा हिलीने सांगितलं आहे.
यूपी वॉरिअर्स स्क्वॉड
एलिसा हिली (C), सोफिया एसेल्टन, दीप्ती शर्मा, ताहिला मगरा, शबनीम इस्माईल, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, प्रश्वी चोप्रा, स्वेता सेहरावत, एस यशरी, किरण नवगिरे, ग्रेस हॅरिस, देविका वैद्य, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, लक्ष्मी यादव.