World Cup 2023 Points Table | पाकिस्तानने मोठ्या विजयासह गुणतालिकेत घेतली झेप, टीम इंडियाची धाकधूक वाढली
World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जय पराजयासह गुणतालिकेत मोठा फरक दिसून येत आहे. एक पराभव किंवा मोठ्या फरकाने झालेला विजय संपूर्ण गणित बिघडवू शकतो. असंच पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत पाहायला मिळाल.
मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दहा संघ सहभागी असून रॉबिन राउंड पद्धतीने सामने होत आहेत. त्यामुळे प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांसमोर एकदाच उभा ठाकणार आहे. प्रत्येक संघ 9 सामने खेळणार असून टॉप 4 संघांची वर्णी उपांत्य फेरीत लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक विजयासोबत नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धेतील नववा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने पाकिस्तानला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला आहे.
श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे श्रीलंकन फलंदाजांनी कामगिरी केली. कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा यांच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 344 धावांचा डोंगर रचला. श्रीलंकेने 9 गडी गमवून 344 धावा केल्या आणि विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तानला पेलवणार नाही असंच सुरुवातीला वाटत होतं. पण पाकिस्तानने करून दाखवलं.
मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफिक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर 345 धावांचं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे पाकिस्तानला 2 गुण तर मिळाले वरून नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणतालिकेत पाकिस्तानने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तसेच नेट रनरेट पाहता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
न्यूझीलंडचा संघ 4 गुण आणि +1.958 नेट रनरेटसह पहिल्या, पाकिस्तान 4 गुण आणि +0.927 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी, दक्षिण आफ्रिका 2 गुण आणि +2.040 नेट रनरेटसह तिसऱ्या आणि भारत 2 गुण आणइ +0.883 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी टीम इंडियाला विजयासोबत नेट रनरेटही चांगला ठेवणं गरजेचं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.