मुंबई : आयपीएलचं ऑक्शनवर सगळ्यांची नजर असते. पण जशी क्रिकेटच्या मैदानात (Strategy on Cricket Ground) रणनिती ठरवावी लागले, अगदी तशीच रणनिती ही आयपीएलच्या (Indian Premier League) संघात खेळांडूंची खरेदी करतानाही तयार ठेवावी लागलेत. कोटींची पर्स घेऊन खेळांडूंच्या लिलावावेळी कुणाला घ्यायचं, कुणाला घेऊन द्यायचं आणि आपल्याला हवा तो खेळाडू कमी किंमतीत कसा मिळेल, यासाठी नेमकं काय करायचं, याचंही प्लानिंग करावं लागंत. हा विषय इतका प्रकर्षानं समोर येण्यामागचं कारण ठरलं, ते म्हणजे दिल्ली कॅपिटल्सच्या ऑक्शन टीममधील (IPL Auction 2022) एक इसम! दिल्लीच्या ऑक्शन टीममधला हा माणूस खेळाडूंची किंमत वाढावी, यासाठी लिलाव करत सुटला. पण जेव्हा खेळाडू घेण्याची वेळ यायची, तेव्हा मात्र हा माणूस चिडीचूप असायचा. शेवटी ज्यानं बोलीमध्ये पछाडलंय, त्याला नाईलाजानं जास्त पैसे मोजून खेळाडू खरेदी करावा लागत होता. हैदराबाद आणि मुंबईसोबत ऑक्शन करताना झालेली गंमत या माणसामुळे चांगलीच चर्चिली जाते. त्याचे अनेक मीम्स तयार झालेत. अनेकांच्या पर्स खाली करायला लावणारा हा माणूस कोण आहे, ते जाणून घेणार आहोत.
किप कार्म एन्ड प्ले आयपीएल, असं म्हणणाऱ्यांना आयपीएल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी एक चेहरा चांगलाच लक्षात राहिला. या चेहऱ्याचं नाव आहे किरण कुमार गांधी.
Kiran Kumar Gandhi from @DelhiCapitals master of negotiations and efficiency kill all the opposition’s.#IPLMegaAuction2022#IPLAuction pic.twitter.com/8rMujbnzP8
— ?️RiNCE?SiNGH RAjPUT? (@Prince_Rajput8) February 12, 2022
किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून ऑक्शन करत आहेत. ऑक्शनच्या पहिल्या दिवशी त्यांनी केलेली खेळी अनेकांना बुचकळ्यात पाडमारी ठरली. ऑक्शनच्या वेळी खेळाडूंची किंमत वाढवण्यात किरण कुमार गांधी यांनी मोलाची भूमिका बजावली. किरण कुमार गांधी यांनी खेळाडूंची किंमत वाढवत नेली.
#IPLMegaAuction2022 मध्ये जबरदस्त स्ट्रॅटेजीसह उतरलेल्या या माणसाने अनेकांचं लक्ष वेधलं
अनेकजण हा माणसाचं नाव गूगल करतायतया माणसाचं नाव आहे किरण कुमार गांधी @kreedajagat
Video credit : @faijalkhantroll #IPL2022MegaAuction #IPL2022Auction #IPL pic.twitter.com/TvZtCPmzFG— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) February 13, 2022
त्यानंतर त्यांनी खेळाडूची खरेदी काही केली नाही. अखेर वाढीव किंमतीत इतर संघांना खेळाडू विकत घ्यावा लागला, असं पाहायला मिळालं. अनेकांच्या पर्स खाली करण्यात किरण कुमार गांधी यांनी टाकलेली गुगली कामी आली. त्यांच्या या रणनितीची चर्चा आता जोरात रंगली आहे.
Kiran kumar gandhi be like-
Sab players mere jeb mein hai.? Huehehehe?#delhicapitals #IPLMegaAuction2022 #IPL2022MegaAuction #IPL #IPL2022 #IPL2022AuctionLive #CricketTwitter pic.twitter.com/OdLFu44OVN— ?DRIJ? S?M?L(Raina fangirl forever) (@samal_ad) February 13, 2022
जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ, एमडी आणि संचालक म्हणून किरण कुमार गांधी ओळखले जातात. दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावत ते नेहमीच दिसून आले आहेत. अलिकडच्या हंगावात एक चांगला संघ तयार करण्यासाठीच्या मॅनेजमेन्टचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून किरण कुमार गांधींकडे पाहिलं जातं. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकी हक्कांमध्येही किरण कुमार गांधींचाही वाटा आहे.
किरण कुमार गांधी एक बिझनेस मॅन आहेत. सध्या ते जीएमआर ग्रूपच्या सीईओंपैकी ते एक अध्यक्ष आहेत. तसंच जीएमआर एअरपोर्ट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालकही आहेत. इतर संघाची पर्स वेळोवेळी खाली करण्यात किरण कुमार गांधी यांनी आयपीएलच्या 2022च्या लिलावात जे काम केलंय, त्याची चर्चा आता सगळीकडे सुरु झाली आहे.
भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय
IPL Auction 2022 : रग्गड कमाई करणाऱ्या आयपीएल खेळाडूंना इनहॅन्ड किती मिळतात? टॅक्स किती बसतो?