Meg Lanning | दिल्लीचा पैसा वसुल, कर्णधार मेग लॅनिंगने मुंबईत पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
यूपी वॉरिअर्सच्या गोलंदाजांना मेग लॅनिंगने अक्षरक्ष: फोडून काढलं. कर्णधार मेग लॅनिंगने तुफानी अर्धशतकी खेळी केली.
मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगमधील पाचव्या सामन्यामध्ये दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने तुफानी अर्धशतकी खेळी केली. यूपी वॉरिअर्सच्या गोलंदाजांना मेग लॅनिंगने अक्षरक्ष: फोडून काढलं. अवघ्या 42 चेंडूत लॅनिंगने आपल्या खेळीमध्ये 70 धावा केल्या यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. सलग दोन सामन्यांमध्ये मेग लॅनिंगने बॅक टु बॅक फिफ्टी केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्याविरूद्ध लॅनिंगने 43 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या होत्या.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाची सलामीवीर कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी जबरदस्त सुरूवात केली. मेग लॅनिंगने बॅक टु बॅक फिफ्टी केली. 42 चेंडूत तिने 70 धावा केल्या असून यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. शफालीला मोठी खेळी करता आली नाही, अवघ्या 17 धावांवर ती परतली.
मरिझेन काप्प आणि एलिस कॅपसे यांनी अनुक्रमे 16 आणि 21 धाव केल्या आणि बाद झाल्या. जेमिमा आणि जेस जोनासेन यांनी मोर्चा हाती घेतला आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने 34 धावा आणि जेस जोनासेनने 42 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मरिझेन काप्प, जेमिमा रॉड्रिग्स, एलिस कॅपसे, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नोर्रिस
युपी वॉरियर्स : अलीसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहिला मॅकग्राथ, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्सलस्टोन, शबनिम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी