IPL 2022 Auction: लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने निवडले 7 खेळाडू, मोठी बोली लावण्याची तयारी?

आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Auction) सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्याआधीच, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रेंचायझीने त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंबाबत संकेत दिले आहेत.

IPL 2022 Auction: लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने निवडले 7 खेळाडू, मोठी बोली लावण्याची तयारी?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 10:48 AM

मुंबई : आयपीएल 2022 चा लिलाव (IPL 2022 Auction) सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. त्याआधीच, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रेंचायझीने त्यांच्या पसंतीच्या खेळाडूंबाबत संकेत दिले आहेत. लिलावात दिल्लीची नजर कोणत्या खेळाडूंवर असणार आहे, याबाबतचे संकेत फ्रेंचायझीकडून (IPL Franchise) मिळाले आहेत. आवश्यक असल्यास या खेळाडूंसाठी संघमालक मोठी बोलू लावू शकतात. मात्र, या संघाला प्रत्येक पाऊल जपून उचलावं लागणार आहे. कारण, बाकीच्या फ्रेंचायझींच्या तुलनेत संघ तयार करण्यासाठी त्यांच्याकडे सर्वात कमी रक्कम आहे. दिल्ली फ्रेंचायझीच्या पर्समध्ये केवळ 47.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. या रकमेत त्यांना असा संघ तयार करायचा आहे, जो आगामी काही वर्षे मजबूत राहील.

दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी सांगितले की, 4 खेळाडूंना कायम ठेवल्यानंतर आता आम्हाला इतर खेळाडूंची गरज आहे जे संघाचा समतोल राखू शकतील. यावेळी आयपीएलचा लिलाव सोपा नसल्याची कबुली आमरे यांनी दिली.

दिल्लीने रिटेन केलेले खेळाडू

  • पहिला खेळाडू – ऋषभ पंत, 16 कोटी रुपये
  • दुसरा खेळाडू – अक्षर पटेल, 9 कोटी रुपये
  • तिसरा खेळाडू – पृथ्वी शॉ, 7.5 कोटी रुपये
  • चौथा खेळाडू – एनरिक नॉर्खिया, 6.5 कोटी रुपये

7 खेळाडू खरेदी करण्यावर भर

दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे म्हणाले की, यावेळी आम्ही अशा 7 खेळाडूंचा शोध घेणार आहोत, जे संघाचा समतोल राखू शकतील. ही गोष्ट आव्हानात्मक देखील असेल कारण यावेळी 2 नवीन संघ – गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स देखील IPL लिलावात असतील.

आमरे यांच्या मतानुसार दिल्लीची मोठी अडचण म्हणजे संघ उभारणीसाठी त्यांच्याकडे कमीत कमी भांडवल उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत या फ्रेंचायझीच्या थिंक टँकसमोर एक उत्तम संघ तयार करणे हे मोठे आव्हान असेल.

जोश आणि अनुभव यांचा मिलाफ गरजेचा – सबा करीम

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या टॅलेंट सर्चचे प्रमुख सबा करीम म्हणाले की, “यंदा आयपीएल लिलाव सर्व संघांसाठी एक समान संधी आहे. ज्यामुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी हेल्थी वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये तरुण आणि अनुभवी, नवीन आणि जुने अशा सर्व प्रकारच्या खेळाडूंचा ताळमेळ असायला हवा आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Auction: बंगळुरुतल्या 2 दिवसांच्या महालिलावात 590 खेळाडूंची विक्री, धवन, वॉर्नर, श्रेयस, बोल्टवर सर्वांच्या नजरा

IPL 2022 Auction: 5 तगड्या खेळाडूंवर मुंबई इंडियन्सची नजर, पर्स रिकामी करणार?

IPL 2022: हार्दिकच्या अहमदाबाद फ्रेंचायजीने संघाच्या नावाची केली घोषणा, काय ठेवलं नाव?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.