WPL : दिल्लीच्या पोरींनी केली खतरनाक कामगिरी, केल्या 400 धावा, कशा ते वाचा
दिल्ली संघाने विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दिल्लीच्या वुमन्स संघाने एक खतरनाक कामगिरी आपल्या नावावर केली आहे.
मुंबई : वुमन्स प्रीमिअरला सुरूवात झाली असून पहिल्या पाच सामन्यांमध्ये मुंबई इंडिअन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघानी शानदार सुरूवात केली आहे. पहिले दोन्ही सामने जिंकले असून पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. मात्र पहिल्या सामन्यामध्ये गुजरातविरूद्ध मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे प्लस 5.185 नेट रन रेटच्या आधारावर पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे दिल्ली संघाने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दिल्लीच्या वुमन्स संघाने एक खतरनाक कामगिरी आपल्या नावावर केली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने दोन सामन्यात एकूण 444 धावा चोपल्या आहेत. पहिला सामना 5 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झाला होता. त्यावेळी पहिल्यांदा बॅटींग करताना 223 धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार मेन लॅनिंगने 43 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 72 धावा केल्या होत्या. तर त्यावेळी लेडी सेहवाग शफाली वर्माचीही बॅट चालली होती. तिने अवघ्या 45 चेंडूत 84 धावा करत लेडी सेहवाग अशी का ओळख निर्माण दाखवून दिलं. त्यानंतर मरिझेन काप्प नाबाद 39 धावा, जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद 22 धावा केल्या होत्या.
दिल्ली संघाच्या दोन विकेट्स पडल्या होत्या एक म्हणजे मेन लॅनिंग आणि शफाली वर्मा. निर्धारित 20 षटकात 223 धावांचा डोंगर उभारला होता. त्यावेळी विरोधी संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 200 चा टप्पा गाठता आला नव्हता. दिल्लीच्या तारा नॉरिस हिने एकटीने 5 विकेट्स घेतल्या होत्या.
दिल्लीचा दुसरा सामना यूपी वॉरिअर्ससोबत होता. या सामन्यामध्येही प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने 211 धावांचं आव्हान यूपी वॉरिअर्स संघाला दिलं होतं. मेग लॅनिंगने बॅक टु बॅक फिफ्टी केली. 42 चेंडूत तिने 70 धावा केल्या असून यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. शफालीला मोठी खेळी करता आली नाही. जेमिमा आणि जेस जोनासेन यांनी या सामन्यात मोर्चा हाती घेत संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने 34 धावा आणि जेस जोनासेनने 42 धावा केल्या होत्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या 212 धावांचा पाठलाग करताना यूपी संघाला निर्धारित 20 षटकात 169 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाने 42 धावांनी विजय मिळवत यूपी वॉरिअर्स संघाचा पराभव केला. एकट्या ताहिला मॅकग्राथ हिने नाबाद 90 धावांची खेळी केली, यामध्ये तिने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. यूपीच्या श्वेता सेहरावतने 1 धाव, किरण नवगिरेने 2 धावा, दीप्ती शर्माने 12 धावा आणि देविका वैद्य 23 धावा यांना कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीकडून जेस जोनासेन सर्वाधिक 3 बळी आणि 42 धावा करत सामनावीरचा पुरस्कार पटकावला.