IPL 2022, DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, चेन्नईची पहिले फलंदाजी, जाणून घ्या संघातील बदल
CSK आज पराभूत झाल्यास तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला दुसरा संघ होईल. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या 55 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीने दोन तर CSKने एका खेळाडूचा बदल केलाय. रवींद्र जडेजा या सामन्यासाठी तंदुरुस्त नाही त्यामुळे दुबे चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. दुसरीकडे पंतनं अक्षर पटेल आणि केएस भरतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. मनदीप सिंग आणि ललित यादव बाद झाले आहेत. संघांबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सचा संघावर सध्या कोरोनाचं सावट आहे. अलीकडेच, डीसीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं काही खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली. या वातावरणाचा कुठेतरी दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्यापासून एक पाऊल दूर आहे. CSK आज पराभूत झाल्यास तो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेला दुसरा संघ होईल. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला
Delhi Capitals have won the toss and they will bowl first against #CSK.#TATAIPL #CSKvDC pic.twitter.com/TmEn7iCDJQ
हे सुद्धा वाचा— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
दोन्ही संघातील प्लेइंग इलेवन
A look at the Playing XI for #CSKvDC #TATAIPL https://t.co/AKRciZ1GCp pic.twitter.com/4pEt4gzBJm
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022
दिल्ली संंघात बदल?
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, श्रीकर भरत, मिचेल मार्श, ऋषभ पंत (w/c), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, रिपल पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, अॅनरिक नॉर्टजे
KS Bharat makes his DC Debut & Bapu returns to the XI ?
Let’s. Go. DC. ?❤️#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #CSKvDC #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @Dream11 pic.twitter.com/1VjNsfPnzL
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 8, 2022
चेन्नई संंघात बदल?
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, मोईन अली, एमएस धोनी (w/c), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, महेश थेक्षना, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी
Squad Update ? IN: DJ and Shivam OUT: Jaddu and Pretorius!#CSKvDC #WhistlePodu #Yellove ?? pic.twitter.com/iBu7rWBVNi
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 8, 2022
दिल्लीवर कोरोनाचं सावट
दिल्ली कॅपिटल्सचा संघावर सध्या कोरोनाचं सावट आहे. अलीकडेच, डीसीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं काही खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली. या वातावरणाचा कुठेतरी दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम होणार आहे.
…तर प्लेऑफच्या शर्यतीतून बाद
धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्यापासून एक पाऊल दूर आहे. CSK आज पराभूत झाल्यास, IPL 2022 मधून बाहेर काढलेला तो दुसरा संघ होईल, मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे.