टी20 क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक घटना, 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी; विकेटकीपरला मिळाली विकेट
Syed Mushtaq Ali Trophy, Delhi vs Manipur: सैयद अली मुश्ताक अली स्पर्धेत एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. दिल्ली विरुद्ध मणिपूर सामन्यात या विक्रमाची नोंद झाली आहे. दिल्लीने मणिपूरविरुद्ध मैदानात उपस्थित 11 खेळाडूंना गोलंदाजी दिली. खासकरून विकेटकीपरने गोलंदाजी करून एक विकेट मिळवली.
टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रमाची नोंद होत असते. मग फलंदाजी, गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण.. काही नवे रेकॉर्ड प्रस्थापित होतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. सैयद मुश्ताक अली स्पर्धेतही अशाच एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. दिल्ली विरुद्ध मणिपूर सामन्यात हा विक्रम नोंदवला गेला आहे. मैदानात उपस्थित 11 खेळाडूंनी गोलंदाजी केली. टी20 क्रिकेट इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी टी20 क्रिकेटच्या एका डावात 9 गोलंदाजांनी गोलंदाजी केल्याची घटना घडली होती. मात्र या सर्वांवर मात करत दिल्लीने मणिपूरविरुद्धच्या सामन्यात अनोखा प्रयोग करत विक्रमाची नोंद केली आहे. मणिपूरने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. मणिपूरची सुरुवातच एकदम खराब झाली. सलामीला आलेला कांगबम प्रियोजीत सिंहला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने एक चाल चालली आणि ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बदोनीने संघातील सर्वच खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली.
आयुष सिंह, अखिल चौधरीनंतर हर्ष त्यागी, दिग्वेश राठी, मयंक रावत यांनी गोलंदाजी केली. यानंतर आयुष बदोनीने विकेटकीपिंग सोडत गोलंदाजी केली. त्यानंतर आर्यन राणा, हिम्मत सिंह, प्रियांश आर्या, यश ढुल आणि अनुज रावतने गोलंदाजी केली. दिल्लीच्या 11 गोलंदाजांनी गोलंदाजी केली असली तर मणिपूरला काही याचा फायदा उचलता आला नाही. मणिपूर संघाला 120 धावा करता आल्या. दिल्लीकडून दिग्वेश राठीने सर्वात चांगली गोलंदाजी केली. 8 धावा देत दोन गडी बाद केले. विकेटकीपर आणि कर्णधार आयुष बदोनीला एक विकेट मिळाला.
DELHI’S FULL SQUAD BOWLS VS MANIPUR
– Delhi made history today by becoming the first-ever team to have all players bowl in a T20 innings against Manipur in the Syed Mushtaq Ali Trophy. This remarkable feat showcases Delhi’s strategic depth and versatility.#SMAT #DELvMAN pic.twitter.com/kzOdTkK0NO
— Akshay Tadvi 🇮🇳 (@AkshayTadvi28) November 29, 2024
दिल्लीने मणिपूरविरुद्धचा सामना 9 चेंडू राखून जिंकला. पण या धावा करताना दिल्लीचा चांगलाच घाम निघाला. कारण दिल्लीने हे लक्ष्य गाठताना 6 विकेट गमावले होते. दिल्लीकडून यश ढुलने नाबाद 59 धावांची खेळी केली. तर इतर फलंदाज धावा करण्यासाठी झुंजताना दिसले.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
मणिपूर (प्लेइंग इलेव्हन): कंगाबम प्रियोजित सिंग, उलेनई खवैरकपम, रेक्स राजकुमार (कर्णधार), अहमद शाह (विकेटकीपर), जॉन्सन सिंग, फेरोइजाम जोतीन, सौगरकपाम सिंग, चिंगाखम बिदाश, एल किशन सिंघा, अजय लामाबम सिंग, बिश्वरजित कोनथौजम.
दिल्ली (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, यश धुल, आयुष बडोनी (कर्णधार), हिम्मत सिंग, अनुज रावत (विकेटकीपर), मयंक रावत, दिग्वेश राठी, हर्ष त्यागी, आर्यन राणा, अखिल चौधरी, आयुष सिंग.