Video : विकेटकीपिंग सोडून ऋषभ पंतला करावी लागली गोलंदाजी, नेमकं सामन्यात काय झालं ते वाचा

दिल्ली क्रिकेट असोशिएशनची दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ असून पुरानी दिल्ली 6 संघाचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. विकेटकीपर बॅट्समन अशी ख्याती असलेल्या पंतला या स्पर्धेत गोलंदाजी करावी लागली.

Video : विकेटकीपिंग सोडून ऋषभ पंतला करावी लागली गोलंदाजी, नेमकं सामन्यात काय झालं ते वाचा
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 5:56 PM

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेचं पहिलं पर्व सुरु आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपर स्टार्स यांच्यात पार पडला. पुरानी दिल्ली 6 संघाचं कर्णधारपद ऋषभ पंतकडे आहे. या सामन्यात ऋषभ पंतचं एक वेगळंच रुप पाहायला मिळलं. अरुण जेटली मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात शेवटचं षटक टाकण्यासाठी ऋषभ पंत स्वत: आला. ऋषभ पंतने विकेटकीपिंगची धुरा दुसऱ्या हाती सोपवली आणि चेंडू हाती घेतली. साउथ दिल्ली सुपरस्टार संघाला 6 चेंडूत विजयासाठी फक्त 1 धाव हवी होती. तेव्हा ऋषभ पंतने गोलंदाजी टाकण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा सामना हातून गेला होता. त्यात साउथ दिल्ली सुपरस्टार्सच्या हाती फलंदाजही होते. त्यामुळे सहज जिंकणार हे क्रीडाप्रेमींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ऋषभ पंत स्वत: गोलंदाजीला उतरला. पण पहिल्याच चेंडूवर सामना संपला.

ऋषभ पंतने पहिलाच चेंडू फुलटॉस टाकला आणि फलंदाजाने सहज एक धाव घेतली आणि सामना संपवला. नाणेफेकीचा कौल साउथ दिल्ली सुपरस्टार्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पुरानी दिल्ली 6 ने 20 षटकात 3 गडी गमवून 197 धावा केल्या आणि विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं. साउथ दिल्ली सुपरस्टार्सने 19.1 षटकात 7 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. साउथ दिल्ली सुपर स्टार्सकडून प्रियांश आर्या आणि कर्णधार आयुष बदोनी यांनी 57-57 धावांची खेळी केली.

कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंत जवळपास दीड वर्षे क्रिकेटपासून दूर होता. संघात परतणार की नाही याबाबतही शंका होती. पण इच्छाशक्तिच्या जोरावर त्याने सर्व संकटांवर मात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळला. तसेच श्रीलंका दौऱ्यात वनडे संघाचा भाग होता. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याची क्षमता तपासण्यासाठी दुलीप ट्रॉफीत खेळवण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत ऋषभ पंत बी संघात आहे. या संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन याच्या खांद्यावर आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.