DPL 2024: दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धा 48 तासात सुरु होणार, जाणून घ्या टीम आणि वेळापत्रक
दुलीप ट्रॉफीची चर्चा सुरु असताना अवघ्या 48 तासांनी दिल्ली प्रीमियर लीग सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्पर्धेची उत्सुकता होती. 17 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये दिग्गज खेळाडू खेळणार आहेत.
दिल्ली क्रिकेट असोसिएशनची दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धा 17 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. स्पर्धेचं हे पहिलंच पर्व असून दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. या स्पर्धेचं वेळापत्रक आणि संघ दिल्ली क्रिकेट असोसिएशनने आधीच जाहीर केलं आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार आहे. स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा ‘पुरानी दिल्ली 6’ संघाकडून खेळणार आहेत. ऋषभ पंतच्या पुरानी दिल्ली 6 चा पहिला सामना 17 ऑगस्टला साउथ दिल्ली सुपरस्टार्सशी होणार आहे. हा सामना रात्री 8.30 वाजता सुरु होईल. तर उर्वरित सामने दुपारी 2 आणि संध्याकाळी 7 वाजता खेळवले जातील. सहा संघ असून 33 सामने होणार आहे. 8 सप्टेंबरला अंतिम सामना होणार आहे.
दरम्यान, 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धा असून ऋषभ पंत अंतिम सामना खेळेल की नाही ही शंका आहे. दुलीप ट्रॉफीच्या टीम बी मध्ये ऋषभ पंत अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.दिल्ली प्रीमियर लीगचे सर्व सामने अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळले जाणार आहे. क्रीडारसिकांना स्पोर्ट्स 18 2 टीव्ही चॅनेलवर या स्पर्धेचं थेट प्रसारण पाहता येईल. तसेच जिओ सिनेमा अप्लिकेशन आणि वेबसाईटवर डीपीएल 2024 स्पर्धेचे सामने मोफत पाहता येतील.
दिल्ली प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील सर्व संघ
पुरानी दिल्ली 6: ऋषभ पंत, ललित यादव, इशांत शर्मा, अर्पित राणा, शिवम शर्मा, प्रिंस यादव, मयंक गुसाई, सनत सांगवान, अंकित भडाना, युग गुप्ता, केशव दलाल, आयुष सिंह, कुश नागपाल, सुमित छिकारा, अर्णव बुग्गा, वंश बेदी, मंजीत, यश भारद्वाज, संभव शर्मा, लक्ष्मण.
साउथ दिल्ली सुपरस्टार: आयुष बडोनी, कुलदीप यादव, प्रियांश आर्य, सुमित माथुर, दिविज मेहरा, कुंवर बिधूड़ी, दिग्वेश राठी, तेजस्वी दहिया, राघव सिंह, सौरभ देसवाल, सार्थक रे, लक्ष्य सहरावत, तरूण बिष्ट, शुभम दुबे, विजन पांचाल, ध्रुव सिंह, मयंक गुप्ता, अंशुमन हुडा, अनिंदो नहाराय, दीपांशु गुलिया.
पूर्वी दिल्ली रायडर्स: अनुज रावत, सिमरजीत सिंह, हिम्मत सिंह, हिमांशु चौहान, हर्ष त्यागी, वैभव शर्मा, मयंक रावत, समर्थ सेठ, प्रणव पंत, सुजल सिंह, हार्दिक शर्मा, रौनक वाघेला, एग्रीम शर्मा, शांतनु यादव, भगवान सिंह, अंश चौधरी, सागर खत्री, शिवम कुमार त्रिपाठी, ऋषभ राणा, लक्ष्य सांगवान.
सेंट्रल दिल्ली किंग्स: यश ढुल, प्रिंस चौधरी, हितेन दलाल, जोंटी सिद्धू, लक्ष्य थरेजा, योगेश शर्मा, मनी ग्रेवार, केशव डबास, शौर्य मलिक, सौरव डागर, आर्यन राणा, सिद्धांत बंसल, रजनीश दादर, सुमित कुमार, कौशल सुमन, दीपेश बालियान, विशांत भाटी, ध्रुव कौशिक, अजय गुलिया.
नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स: हर्षित राणा, सुयश शर्मा, प्रांशु विजयरन, वैभव कांडपाल, क्षितिज शर्मा, वैभव रावल, यश डबास, प्रणव राजवंशी, मनन भारद्वाज, यश भाटिया, यतीश सिंह, अमन भारती, यजस शर्मा, सार्थक रंजन, अनिरुद्ध चौधरी, शिवम , यथार्थ सिंह, सिद्धार्थ सोलंकी, ध्रुव चौहान, युवराज राठी.
वेस्ट दिल्ली लायन्स: रितिक शौकीन, नवदीप सैनी, देव लाकड़ा, दीपक पुनिया, शिवांक वशिष्ठ, अखिल चौधरी, आयुष दोसेजा, कृष यादव, अनमोल शर्मा, युगल सैनी, अंकित राजेश कुमार, विवेक यादव, आर्यन दलाल, मासाब आलम, एकांश डोबाल, शिवम गुप्ता, योगेश कुमार, सूर्यकांत चौहान, तिशांत डाबला, इब्राहिम अहमद मसूदी.