Sunil Gavaskar : सुनील गावस्कर यांना कॉमेन्ट्रीमधून हटवण्याची मागणी, हेटमायरच्या पत्नीचा गावसकरांच्या कॉमेन्ट्रीशी संबंध?

गावस्कर इंग्रजीत कॉमेंट्री करत होते. हेटमायर क्रीजवर येताच गावस्कर यांनी टिप्पणी केली.

Sunil Gavaskar : सुनील गावस्कर यांना कॉमेन्ट्रीमधून हटवण्याची मागणी, हेटमायरच्या पत्नीचा गावसकरांच्या कॉमेन्ट्रीशी संबंध?
सुनील गावस्कर यांना कॉमेन्ट्रीमधून हटवण्याची मागणीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 9:19 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता गावस्कर यांना आयपीएल (IPL 2022) कॉमेंट्रीमधून हटवण्याची मागणी होत आहे. राजस्थान रॉयल्स (RR) स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या पत्नीबद्दल असभ्य टिप्पणी केल्याबद्दल गावसकरांना पुन्हा एकदा टीकाकारांना सामोरं जावं लागतंय. आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत होणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 6 गड्यांच्या मोबदल्यात 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवात चांगली झाली. मात्र त्यानंतर संघ अडकल्याचे दिसत होते. अशा परिस्थितीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर फलंदाजीसाठी क्रीझवर आला. आता हेटमायर क्रीझवर येताच गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल सर्वजण टीका करत आहेत. यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सकडून गावस्कर यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

काय म्हणालेत गावस्कर?

खरं तर पहिल्या मुलाच्या जन्मामुळे हेटमायरने राजस्थानसाठी काही सामने गमावले आणि तो घरी परतला. पण त्याने चेन्नईविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आणि फलंदाजीला उतरला. राजस्थानच्या डावाच्या 15व्या षटकात हेटमायर फलंदाजीला आला. यावेळी गावस्कर इंग्रजीत कॉमेंट्री करत होते. हेटमायर क्रीजवर येताच गावस्कर यांनी टिप्पणी केली, ‘शिमरन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का? असं बोलताच सोशव मीडियावर नेटिझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला.

चाहत्यांनी गावस्करांना फटकारलं

गावस्कर यांच्या या वक्तव्यानंतर चाहते आता सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. काही चाहते त्यांना कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणीही करत आहेत. मात्र, हेटमायरला या सामन्यात विशेष काही करता आले नाही आणि तो 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. त्याला प्रशांत सोळंकीने झेलबाद केले. गावस्कर यांनी यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल भाष्य केले होते आणि त्यानंतरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.

हेटमायर क्रीजवर येताच…

गावस्कर इंग्रजीत कॉमेंट्री करत होते. हेटमायर क्रीजवर येताच गावस्कर यांनी टिप्पणी केली, ‘शिमरन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का? असं बोलताच सोशव मीडियावर नेटिझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला.

अश्विनची चमकदार कामगिरी

रविचंद्रन अश्विन आयपीएल 2022 मध्ये आपल्या बॉल आणि बॅटने खूप चमकदार खेळी खेळत आहे. या स्टार अष्टपैलू खेळाडूने शुक्रवारी त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चेंडू आणि बॅटने चमकदार कामगिरी केली. अश्विनने प्रथम गोलंदाजीत 4 षटकात 28 धावा देऊन एक बळी घेतला आणि त्यानंतर फलंदाजीत हात उघडला आणि 40 धावांची नाबाद आणि सामना जिंकणारी खेळी खेळली. आपल्या खेळीदरम्यान त्याने 23 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.