Deodhar Trophy 2023 Final | रोहन कुन्नम्मल याचं शानदार शतक, ईस्ट झोन टीमला 329 धावांचं आव्हान
Deodhar Trophy Final 2023 South Zone vs East Zone | देवधर ट्रॉफीसाठी अंतिम सामन्यात ईस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन यांच्यात महाअंतिम सामना खेळवण्यात येत आहे.
पुद्देचरी | साऊथ झोन क्रिकेट टीमने देवधर ट्रॉफी 2023 फायनलमध्ये ईस्ट झोनला विजयासाठी 329 धावांचं आव्हान दिलं आहे. साऊथ झोनने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 328 धावा केल्या. साऊथ झोनकडून एकाने शतक तर दोघांनी अर्धशतकी खेळी केली. साऊथ झोनकडून रोहन कुन्नम्मल याने शतक ठोकलं. तर एन जगदीशन आणि कॅप्टन मयंक अग्रवाल या दोघांनी अर्धशतक ठोकलं.
रोहनने 75 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 107 धावा केल्या. तर मयंक अग्रवाल याने 83 बॉलमध्ये 4 फोरसह 63 रन्सची खेळी केली. तर एन जगदीशनने 60 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. साई सुदर्शन 19, रोहित रायुडू 26 आणि अरुण कार्थिक याने 2 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याला भोपळाही फोडता आला नाही. तर शेवटच्या क्षणी साई किशोर याने 19 बॉलमध्ये 24 धावा केल्या. तर विजयकुमार विशक याने 11 धावा केल्या. त्यामुळे साऊथ झोनला 300 पार मजल मारता आली.
ईस्ट झोनला विजयासाठी 329 धावांचं आव्हान
Innings break!
Rohan Kunnummal’s blistering 107(75) helps South Zone post 328/8?
The spinners helped East Zone fight hard after the South Zone openers had put on a terrific 181-run stand ?
Scorecard – https://t.co/5eKGBMVQ9b#DeodharTrophy | #Final | #SZvEZ pic.twitter.com/v52KPIaxLF
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 3, 2023
ईस्ट झोनकडून शहाबाज अहमद, रियान पराग आणि उत्कर्ष सिंह या तिकडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एम मुरासिंह आणि आकाश दीप या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
साऊथ झोन प्लेईंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कॅप्टन), अरुण कार्तिक, रोहन कुन्नम्मल, साई सुधरसन, एन जगदीसन (विकेटकीपर), रोहित रायडू, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, वासुकी कौशिक, विजयकुमार विशक आणि विद्वत कवेरप्पा.
ईस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | सौरभ तिवारी (कॅप्टन), अभिमन्यू ईश्वरन, उत्कर्ष सिंग, विराट सिंग, रियान पराग, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग, आकाश दीप, सुदीप कुमार घरामी आणि मुख्तार हुसेन.