डरबन : IPL टुर्नामेंटमध्ये खेळणारे अनेक क्रिकेटपटू सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या T20 लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवतायत. मंगळवारी डेवाल्ड ब्रेव्हिसने दमदार खेळ दाखवला. डेवाल्ड ब्रेव्हिसने नाबाद 70 धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्स केपटाऊनने पार्ल रॉयल्सवर 8 विकेट राखून आरामात विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेतील टी 20 लीगध्ये आयपीएलमधील फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिसचा या लीगमधील खेळ पाहून तो आयपीएलच्या आगामी सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ओपन करु शकतो, अशी चर्चा आहे.
भविष्यातील तो मोठा स्टार
क्रिकेट विश्वात डेवाल्ड ब्रेव्हिस बेबी एबी म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटिंगमध्ये एबी डिविलियर्सची झलक पहायला मिळते. म्हणून त्याला बेबी एबी म्हणतात. यंदाच्या SA 20 लीगमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा तो पहिला खेळाडू आहे. बेबी एबीने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून डेब्यु केला. त्याची बॅटिंग पाहून भविष्यातील तो मोठा स्टार असल्याची कल्पना आली. तो मुंबई इंडियन्ससाठी मॅचविनिंग खेळी करु शकला नाही.
ब्रेव्हिसच्या खेळात बरीच सुधारणा
आता डेवाल्ड ब्रेव्हिसच्या खेळात बरीच सुधारणा झालीय. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक चांगला अनुभव आलाय. त्यामुळे यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी तो महत्त्वाचा बॅट्समन ठरु शकतो. 41 चेंडूत 70 धावा फटकावल्यानंतर बेबी एबीच त्याचा मार्गदर्शक एबी डी विलियर्सनेही कौतुक केलं.