महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी 65 कोटींच होणार स्टेडियम, युवराज-झहीरसमोरच धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

टीम इंडियाचे स्टार खेळाडू युवराज सिंह आणि झहीर खान यांच्यासमोरच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. क्रिकेटच्या फायनलसाठीि प्रमुख उपस्थिती असलेल्या दोन्ही खेळाडूंसमोर मुंडे यांनी स्टेडियमबाबत घोषणा केली.

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी 65 कोटींच होणार स्टेडियम, युवराज-झहीरसमोरच धनंजय मुंडेंची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 10:35 PM

बीड, दिनांक 3 मार्च, 2024 : देशात सर्वत्र क्रिकेटप्रेमी आपल्याला पाहायला मिळतील. बीसीसीआयसुद्धा गुणवंत खेळाडूंसाठी नवनवीन गोष्टी करत असलेलं पाहायला मिळत आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीनंतर आयपीएलमध्ये खेळाडूंना फ्रंचायसी पाण्यासारखा पैसा ओतून खेळाडूंना खरेदी करतात. तिथे एकदा गडी चमकला की भारतीय संघात आपली जागा फिक्स करतो. यासाठी लहानपणापासूनच मुलांना क्रिकेटची आवड आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारही आता पुढाकार घेत असल्याचं दिसत आहे. अशातच महाराष्ट्रातील मंत्र्याने स्टेडियमची मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील बीडमध्ये स्टेडियमची होणार असल्याची घोषणा मंत्र्याने केली आहे. ‘नाथ प्रतिष्ठान’ आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ही घोषणा केली गेली. परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयासमोर सुरू असलेल्या नामदार चषक स्पर्धेचा आज फायनल सामना होता. जेकेसीसी विरुद्ध जय श्रीराम या दोन संघात फायनल सामना झाला, यामध्ये जय श्रीराम संघाने हा सामना दोन विकेटने जिंकला. या सामन्यावेळी युवराज सिंग आणि जहीर खान उपस्थित होते.

युवराज सिंग, झहीर खान आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते एक लाखाचे बक्षीस देऊन या टीमचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत उभारणार स्टेडियम 65 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू झहीर खान आणि युवराज सिंह यांनी या सामन्याला उपस्थिती लावली होती. झहीर खानने यावेळी मराठीमध्ये भाषण करत सर्व खेळाडूंना मेहनत करत राहा, असं आवाहन केलं.

झहीर खानचं मराठीत भाषण

मला आणि युवराज आमंत्रित केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे आभार, मला आजचा सामना पाहून माझे  जुने दिवस आठवले. मीसुद्धा अशा खूप टूर्नामेंट खेळलोय. तुम्हाला सर्वांना माहित आहे ना की मी श्रीरामपूरचा आहे. असं काही नाही की टेनिस बॉलने सुरू केलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही वरील पातळीवरील क्रिकेट खेळू नाही शकत. धनजंय मुंडे यांनी क्रिकेट स्टेडियमची घोषणा केला मला चांगलं वाटलं. कारण जर चांगल्या सुविधा मिळाल्या की वरील पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळते असं झहीर खान आपल्या भाषणावेळी म्हणाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.