युझवेंद्र चहलची टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड, धनश्री वर्माची इंस्टा स्टोरी व्हायरल

Dhanshree Verma Insta Story Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलला टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियात स्थान मिळालंय. चहलची निवड होताच धनश्री वर्माची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे.

युझवेंद्र चहलची टी 20 वर्ल्ड कपमध्ये निवड, धनश्री वर्माची इंस्टा स्टोरी व्हायरल
Dhanshree Verma and Yuzvendra Chahal,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:57 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. बीसीसीआय निवड समितीने सोशल मीडियावरुन वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. टीम इंडियाच्या मुख्य संघात एकूण 15 खेळाडू आहेत. तर 4 राखीव खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर हार्दिक पंड्या उपकर्णधारपदाची जबाबजारी सांभाळणार आहे. वर्ल्ड कपद्वारे अनेक खेळाडूंचं संघात पुनरागमन झालंय. तर काहींना मुख्य संघात स्थान मिळवण्यात अपयश आलंय.

ऋषभ पंत याच्या कमबॅकमुळे केएल राहुल याला डच्चू मिळाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऋषभ पंतने अपघाताच्या 15 महिन्यानंतर आयपीएलमध्ये कमबॅक केलं. त्याने आयपीएलमध्ये समाधानी कामगिरी केलीय. संजू सॅमसन याचीही निवड करण्यात आलीय. संजूच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील नंबर 1 टीम ठरलीय. तसेच टीम इंडियाचा टॉपचा स्पिनर युझवेंद्र चहल याचं पुनरागमन झालंय. चहलच्या कमबॅकमुळे ‘कुलचा’ (कुलदीप-युझवेंद्र) जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे.

धनश्री वर्माची इंस्टा स्टोरी व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Gupshup (@guppshuppp)

युझवेंद्रची टीम इंडियात तब्बल 8 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. चहलने अखेरचा टी 20 सामना हा वेस्ट इंडिज विरुद्ध 13 ऑगस्ट 2023 रोजी खेळला होता. चहलची टीम इंडियात निवड होताच त्याची पत्नी धनश्री वर्मा हीची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. धनश्रीने इंस्टा स्टोरीत काय म्हटलंय, जाणून घेऊयात.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या ज्या खेळाडूंची निवड झालीय, त्यांचा फोटो धनश्रीने इंस्टा स्टोरीत पोस्ट केलाय. तसेच धनश्रीने युझवेंद्र चहलला मेन्शन करत “तो परत आलाय” या कॅप्शनसह हार्ट इमेज पोस्ट केली आहे. धनश्रीची ही इंस्टा पोस्ट व्हायरल झाली आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.