IPL 2022, CSK vs MI : धोनीची टीम 97 धावांवर गारद, इंडियन्ससमोर 98 धावांचं लक्ष्य, चेन्नईची खराब सुरुवात, शेवट इंडियन्सच्या हातात, पाहा Highlights Video
प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या.
मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सॅम्सने तीन, मेरेडिथ आणि कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चेन्नईचे फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खाते न उघडता बाद झाला. उथप्पानं 1, ऋतुराजनं 7 आणि रायुडूने 10 धावा केल्या. शिवम दुबेही 10 धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राव्होने 12 धावा केल्या आणि सिमरजीत दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे मुंबई इंडियन्ससमोर चेन्नईनं 98 धावांचं लक्ष्य ठेवलंय.
धोनीचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Innings Break!
Brilliant bowling display from the @mipaltan as #CSK are all out for 97 runs in 16 overs.
Scorecard – https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/2mQjY5byPr
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
Thala gets us to 97. Second half awaits…#CSKvMI #WhistlePodu #Yellove ?? pic.twitter.com/3AalkXb5Vn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 12, 2022
धोनीच्या सर्वाधिक 36 धावा
चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी असेल. चेन्नईचे 11 सामन्यांत चार विजय मिळवून आठ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, मुंबईपेक्षा एक स्थान वर आहे.
धोनीचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Two wickets in the first over and bowling figures of 3/16 makes Daniel Sams our Top Performer from the first innings.
A look at his bowling summary here ?? #TATAIPL #CSKvMI pic.twitter.com/o1YHDASWEH
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
सॅम्सनंची अप्रतिम गोलंदाजी
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. चेंडू लेग-स्टंप चुकल्यासारखं दिसत होता. पण स्टेडियममध्ये वीजपुरवठा खंडित असल्यानं डीआरएस उपलब्ध नाही.
Daniel Sams picks up two wickets in the first over.
Devon Conway and Moeen Ali depart.
Live – https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL pic.twitter.com/j6mKbC25hc
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
मोईन अली झेलबाद
ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोईन अली झेलबाद झालाय. त्यालाही आपलं खातं उघडता आलं नाही. पहिल्या षटकात फक्त पाच धावा काढता आल्या.
मोईनची विकेट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Match 59. WICKET! 0.4: Moeen Ali 0(2) ct Hrithik Shokeen b Daniel Sams, Chennai Super Kings 2/2 https://t.co/c5Cs6DqFJi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
बुमराह फॉर्ममध्ये
आज सामन्यात जसप्रीत बुमराहनं आपला मागील सामन्यातील फॉर्म कायम ठेवल्याचं दिसतंय. त्यानं त्याच्या पहिल्याच षटकात रॉबिन उथप्पाला एलबीडब्ल्यू आऊट केलंय.
Match 59. WICKET! 1.4: Robin Uthappa 1(6) lbw Jasprit Bumrah, Chennai Super Kings 5/3 https://t.co/c5Cs6DHILi #CSKvMI #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी असेल. चेन्नईचे 11 सामन्यांत चार विजय मिळवून आठ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, मुंबईपेक्षा एक स्थान वर आहे.