ध्रुव जुरेल आणि सरफराज खानचं नशिब चमकलं, आता थेट मिळणार सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये एन्ट्री; का आणि कसं ते जाणून घ्या

बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना इंगा दाखवला आहे. सेंट्रल काँट्रॅक्टमधून या दोघांचा पत्ता कापला आहे. त्यामुळे भल्याभल्यांचे धाबे दणाणले आहेत. असं असताना नवोदित क्रिकेटपटू ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांना सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये एन्ट्री मिळणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे त्यांचं नशिब फळफळणार आहे.

ध्रुव जुरेल आणि सरफराज खानचं नशिब चमकलं, आता थेट मिळणार सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये एन्ट्री; का आणि कसं ते जाणून घ्या
व जुरेल, सरफराज खान येणार सेंट्रल काँट्रॅक्टमध्ये, धर्मशाळेत लागणार 1 कोटींची लॉटरी; कसं ते समजून घ्या
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 5:14 PM

मुंबई : बीसीसीआयने नव्याने सेंट्रल काँट्रॅक्ट जाहीर केला आहे. या वार्षिक खेळाडू करारातून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळण्यात आलं आहे. श्रेयस अय्यर ब श्रेणीत, तर इशान किशन क श्रेणीत होता. त्यामुळे या दोघांचं वार्षिक कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. ए प्लस कॅटेगरीत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. त्यांना वार्षिक करारातून 7 कोटींची रक्कम मिळणार आहे. तर ए कॅटेगरीत असलेल्या आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या यांना वार्षिक 5 कोटी मिळणार आहेत. तर बी श्रेणीत असलेल्या सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल यांना 3 कोटी मिळणार आहेत. तर क श्रेणीत असलेल्या खेळाडूंना 1 कोटींची वार्षिक रक्कम मिळणार आहे. असं असताना धर्मशाळा कसोटीनंतर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचं नशिब फळफळणार आहे. कारण बीसीसीआयच्या नियमामुळे त्यांना फायदा होणार आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार जे खेळाडू किमान 3 कसोटी किंवा 8 वनडे किंवा 10 टी20 खेळण्यांचा निकष पूर्ण करतील त्यांची आपोआप क श्रेणीत वर्णी लागेल. त्यामुळे ध्रुव जुरेल आणि सरफराज खान यांना फायदा होणार आहे. या दोघांनी आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामना हा त्यांच्यासाठी तिसरा सामना असणार आहे. त्यामुळे त्यांची वर्णी आपोआप क श्रेणीत लागणार आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक करारनुसार 1 कोटी रुपये मिळतील.

बीसीसीआयने आतापर्यंत क श्रेणीत 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यात रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांचा समावेश आहे. आता या यादीत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचाही समावेश होईल.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.