Dhruv Jurel | ध्रुव जुरेल याचं अर्धशतक हुकलं, पण खास रेकॉर्डला गवसणी
Dhruv Jurel | ध्रुव जुरेल याने आपल्या पदार्पणातच टीम इंडियाला खरी गरज असताना निर्णायक क्षणी आर अश्विन याच्यासह अर्धशतकी भागीदारी केली. तसेच त्याने खास रेकॉर्ड केला.
राजकोट | इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी पदार्पण केलं. सरफराज टीम इंडियासाठी पदार्पण करणारा 311 आणि ध्रुव जुरेल 312 वा खेळाडू ठरला. सरफराजने पदार्पणात 62 धावांची शानदार खेळी केली. सरफराज दुर्देवाने रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलवर रन आऊट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलची वेळ होती. ध्रुव जुरेल याला दुसऱ्या दिवशी बॅटिंगची संधी मिळाली.
रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. कुलदीप 4 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. कुलदीपनंतर रवींद्र जडेजा यानेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जडेजानंतर आर अश्विन बॅटिंगसाठी आला. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यामुळे आता या दोघांवर सर्व जबाबदारी होत्या. आर अश्विन याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. अश्विनने युवा ध्रुवसोबत टीम इंडियाचा धावफळक हलता ठेवला. या दोघांनी 77 धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यानंतर आर अश्विन आऊट झाला.
अश्विनपाठोपाठ 4 ओव्हरनंतर ध्रुव जुरेल हा देखील आऊट झाला. ध्रुवला पदार्पणात अर्धशतक ठोकण्याची संधी होती. मात्र तो दुर्देवी ठरला. ध्रुवचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. ध्रुवने 104 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. ध्रुव अशाप्रकारे या मालिकेत आतापर्यंत टीम इंडियासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा विकेटकीपर ठरला.
ध्रुव जुरेलची पदार्पणात चिवट खेळी
He narrowly missed out on a fifty…
…but that was a fine knock on Test debut from Dhruv Jurel 👌 👌
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/So2Ztv8GiB
— BCCI (@BCCI) February 16, 2024
30 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक
ध्रुवने विकेटकीपर म्हणून 46 धावांच्या खेळीसह टीम इंडियाच्या माजी क्रिकेटरचा 30 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ध्रुवने नयन मोंगिया याचा 1994 सालचा विक्रम मोडीत काढला आहे. नयन मोंगियाने विकेटकीपर म्हणून 1994 साली श्रीलंका विरुद्ध 44 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.