Duruv Jurel | ध्रुव जुरेल याचं झुंजार अर्धशतक, इंग्लंड विरुद्ध जोरदार लढा
Dhruv Jurel Fifty India vs England | ध्रुव जुरेल याने टीम इंडियाची एक बाजू लावून धरत कसोटी कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं आहे. ध्रुवकडून आता शतकाची अपेक्षा आहे.
रांची | ध्रुव जुरेल याने राजकोटमधील इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. ध्रुव जुरेल याला आपल्या पदार्पणात अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र ध्रुव जुरेलचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. ध्रुव 46 धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर रांचीतील पुढच्याच कसोटीत ध्रुवने संधी साधत टीम इंडियासाठी निर्णायक क्षणी झुंजार खेळी करत अर्धशतक झळकावलं. ध्रुवला कुलदीप यादव याच्यानंतर डेब्यूटंट आकाश दीप याने चांगली साथ दिली. ध्रुवने आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. ध्रुवने टीम इंडिया अडचणीत असताना ही खेळी केली. ध्रुवने 96 बॉलमध्ये 52.08 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक पूर्ण केलं.
ध्रुव-कुलदीपची निर्णायक भागीदारी
दरम्यान इंग्लंडच्या 353 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी झालीय. इंग्लंडच्या 20 वर्षीय युवा शोएब बशीर याने घेतलेल्या 4 विकेट्समुळे टीम इंडियाची दुसऱ्या दिवशी 7 बाद 177 अशी स्थिती झाली. मात्र तिथून कुलदीप आणि ध्रुव या दोघांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या दिवसापर्यंत नाबाद 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.
ध्रुवला दुसऱ्या बाजूने कुलदीप यादव याने कमालीची साथ दिली. मात्र काही ओव्हरनंतर जेम्स एंडरसन याने कुलदीप यादव याला बोल्ड करत ही जोडी फोडली. कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव 131 बॉलमध्ये 28 धावा करुन माघारी परतला. कुलदीपनंतर डेब्युटंट आकाश दीप मैदानात आला. आकाश दीपच्या मदतीने ध्रुवने अर्धशतक पूर्ण केलं. आता आकाशकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची आशा आहे.
ध्रुवची झुंजार अर्धशतकी खेळी
Maiden Test FIFTY! 🙌 🙌
Well played, Dhruv Jurel 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/G2Gjjuh607
— BCCI (@BCCI) February 25, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.