रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी विसरला का? मागच्या 8 डावात काय केलं? वाचा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागला आहे. या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या पराभवात कर्णधार रोहित शर्माची कामगिरीही कारणीभूत ठरली आहे. मागच्या आठ डावात रोहित शर्माची आकडेवारी बरंच काही सांगत आहेत.

रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी विसरला का? मागच्या 8 डावात काय केलं? वाचा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 6:15 PM

भारताने न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना हा केवळ औपचारिक असणार आहे. 68 वर्षानंतर न्यूझीलंडने भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात हा सर्वात वाईट रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची खराब फलंदाजी जबाबदार आहे. खासकरून रोहित शर्माची फलंदाजी चिंतेचा विषय ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माचा आलेख मागच्या आठ डावात घसरला आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात तर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दुसऱ्या डावात टीम इंडियाला गरज असताना 16 चेंडूचा सामना केला आणि 8 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. संपूर्ण मालिकेत रोहित शर्मा एक एक धावांसाठी झुंजताना दिसला आहे

रोहित शर्माने मागच्या 8 कसोटी डावात 14 च्या सरासरीने फक्त 104 धावा केल्या.रोहित शर्माच्या खराब फलंदाजीचा फटका टीम इंडियाला बंगळुरुत बसला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत 359 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेला. त्यामुळे रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहेपुणे कसोटी च्या पहिल्या डावात 9 चेंडूचा सामना केला आणि भोपळाही फोडता आला नाही. तर दुसऱ्या डावात 8 धावा केल्या. रोहित शर्माची न्यूझीलंडविरुद्ध चार डावांमध्ये एकूण 62 धाव केल्या. यावेळी त्याची सरासरी 15.50 इतकी आहे. बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने 52 धावा केल्या होत्या. पण इतर तीन डावात मात्र फेल गेला आहे.

न्यूझीलंडनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी ही मालिका फारच महत्त्वाची आहे. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत मागच्या दोन पर्वात पराभूत केल्याने ऑस्ट्रेलियन संघही खवळलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ हॅटट्रीक करणार की ऑस्ट्रेलिया पराभूत करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीत गणित पाहता रोहित शर्माचं फॉर्ममध्ये येणं आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन.
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.